पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभाई पटेल रूग्णालयात घाणीचे साम्राज्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:56 AM2021-03-31T11:56:59+5:302021-03-31T12:00:19+5:30

कोरोना ड्युटी करायची नाही म्हणून ऊन कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक माहिती पसरवल्याचा प्रशासनाचा दावा

Complaints of unhygienic situation at Pune cantonment's covid hospital.. | पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभाई पटेल रूग्णालयात घाणीचे साम्राज्य.

पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभाई पटेल रूग्णालयात घाणीचे साम्राज्य.

googlenewsNext

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात कोरोना रुग्णांना पुन्हा एकदा अस्वच्छता, घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. सध्या बेड उपलब्धतेची एकूण परिस्थिती पाहता ट्रीटमेंट मिळतीये‌ या एका कारणासाठी रुग्ण या परिस्थितीत राहत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या परिसरात स्वच्छतेचे सगळे नियम पाळले जात असून केवळ कोरोना ड्युटी करायची नाही म्हणूनच काही कर्मचारी गैरसमज पसरवत असल्याचा दावा केला आहे.

 

पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत मिळेल त्या हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्ण उपचार घेताना दिसत आहेत. मात्र कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयात यात उपचार घ्यायच्या ऐवजी इथल्या अस्वच्छतेमुळे आणखी आजारी पडू का काय असा प्रश्न रुग्णांना पडला आहे.

 

 अन्नाचा प्लेट्स चा लागलेला ढीग, अस्वच्छ बाथरूम आणि घाण अशा अवस्थेत रहायची वेळ आल्याचा दावा रुग्णांकडून करण्यात आलेला आहे. स्टाफ पुरेसा नसल्यामुळे रुग्णांना आवश्यक मदत मिळत नसल्याचा ही दावा करण्यात येत आहे. वृद्ध रुग्णांच्या मदतीसाठी ही स्टाफ नाही, परिसरात अस्वच्छता आहे पण हा सगळा त्रास नेमका सांगायचा कुणाला असा सवाल रुग्णांकडून विचारला जातोय.

 

दरम्यान इथल्या एका वॉर्डबॉयच्या मते इथे मनुष्यबळ कमी असल्याने तीन ते चार जणांचे एकाच माणसाला करावे लागत आहे. तसेच या कामाचा मोबदला देखील कमी मिळत असल्याचा आणि नोकरीमध्ये कायम केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

याविषयी विचारले असता कॅन्टोन्मेंट बोर्ड चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्याधर गायकवाड म्हणाले ," कोरोना विभागात काम करायचे नसल्याने इथल्या स्टाफच्या काही लोकांनी हे फोटो जाणीवपूर्वक पसरवले आहेत. कोरोना पेशंट ॲडमिट असलेला भाग हा पूर्णपणे स्वच्छ असून हे फोटो ज्या ठिकाणी आग लागली होती आणि सध्या काम सुरू आहे हे त्या ऑपरेशन थिएटरच्या परिसरातले आहेत."

 

 

Web Title: Complaints of unhygienic situation at Pune cantonment's covid hospital..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.