Corona Vaccination: मुळशीकरांचे दोन्ही डोस पूर्ण; राज्यातील पहिला १०० टक्के लसीकरण झालेला तालुका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 01:40 PM2021-10-18T13:40:02+5:302021-10-18T13:52:10+5:30

पुणे जिल्ह्याच्या मुळशी (mulshi) तालुक्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे कोरोना (vaccination) लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.

Complete both doses of mulshi cirizens the first vaccination free taluka in the state | Corona Vaccination: मुळशीकरांचे दोन्ही डोस पूर्ण; राज्यातील पहिला १०० टक्के लसीकरण झालेला तालुका

Corona Vaccination: मुळशीकरांचे दोन्ही डोस पूर्ण; राज्यातील पहिला १०० टक्के लसीकरण झालेला तालुका

googlenewsNext
ठळक मुद्देमिशन कवच कुंडल अभियान ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : पुणे जिल्ह्याच्या मुळशी (mulshi) तालुक्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरणाचे (corona vaccination) दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मिशन कवच कुंडल (mission kavach kundal) अभियानाचा ग्रामीण भागात चांगला परिणाम झाला असून, खेड, मुळशी आणि आंबेगाव तालुक्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यात सलग 75 तास लसीकरण मोहिमेत अनेक ठिकाणी दिवस - रात्र लसीकरण करण्यात आले. 

मिशन कवच कुंडल अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस, सलग ७५ तास कोविड लसीकरण, कांविड लसीकरण आपल्या दारी, कोविड लसीकरणाचे पुर्ण संरक्षित गाव, विक्रमी उद्दिष्ट ५ लक्ष लसीकरण, महिलांचे शंभर टक्के लसीकरण, खाजगी संस्थांचा सक्रीय सहभाग असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकंदरीत ८९८ खाजगी व १ हजार १६ शासकीय कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून,  एकंदरीत प्रशिक्षित मनुष्यबळाचा व खाजगी संस्थांचा सहभाग लक्षात घेता एकाच दिवसात ५ लक्ष लाभार्थ्यांचे कोविड लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  

दुर्गम व वाहतुकीसाठी कठीण असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण ज्याठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण शक्य नसेल आणि कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुक व्यवस्था नसेल अशा ठिकाणी  वाहन व्यवस्था घरोघरी भेटी देवून शिल्लक लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत घेवून येणे. महिलांच्या १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट असे उपक्रम हाती घेतले आहे. या मिशन कवच कुंडल अभियानाचा चांगला परिणाम दिसून आल्याने जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी आता 31 डिसेंबर अखेर पर्यंत मोहिम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

खेड, मुळशी आणि आंबेगाव तालुक्यांत पहिला डोस १०० टक्के पूर्ण

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड, मुळशी आणि आंबेगाव तालुक्यांत पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला आहे. तर सर्वच तालुक्यातील पहिल्या डोसची टक्केवारी ६० टक्क्याच्या पुढे गेली आहे. यात बारामती तालुक्यात ७५ टक्के, भोर ७३ टक्के, इंदापूर ७४ टक्के, जुन्नर ८५ टक्के, मावळ ९८ टक्के, पुरंदर ८६ टक्के, शिरूर ९० टक्के, वेल्हा ७६ टक्के लसीकरण झाले आहे. 

मिशन कवच कुंडल (mission kavach kundal) अभियानाचा परिणाम

''शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात अत्यंत सुक्ष्म नियोजन करून मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले. याचा चांगला परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी दिवस रात्र लसीकरण सुरू होते. यामुळे दोन-तीन शिफ्ट मध्ये काम करणा -यांना लसीकरण करता आले. हा प्रतिसाद पाहून आता मिशन कवच कुंडल अभियान ३१ ऑक्टोबर पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.''

मुळशी तालुक्यात १५९ टक्के लोकांचा पहिला तर १०६ टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण 

मुळशी तालुक्यात आयटी व एमआयडीसी क्षेत्रामुळे सतत स्थलांतरीत होणा-या नागरिकांची संख्या अधिक आहे. यामुळेच कोरोना लसीकरणासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण या तालुक्यात झाले आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी शंभर टक्क्यापेक्षा अधिक म्हणजे १५९ टक्के तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १०६ टक्के ऐवढी झाली आहे.

Web Title: Complete both doses of mulshi cirizens the first vaccination free taluka in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.