पुणे महापालिकेच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करा; मुक्ता टिळक यांच्या प्रशासनास सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:26 PM2018-01-04T12:26:44+5:302018-01-04T12:30:04+5:30
गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिल्या.
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिल्या. जानेवारी अखेरीस इमारतीचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या विस्तारीत इमारतीचे काम सुरू असून, त्यात, सव्वाशे दोनशे सदस्यांची आसन व्यवस्था असलेल्या सभागृहाचा समावेश आहे. तसेच, प्रमुख प्रदाधिकाऱ्यांसह महत्त्वाच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची कार्यालयेही राहणार आहेत. वेगवेगळ्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था आहे. या इमारतीचे काम लवकर पूर्ण करून नव्या वर्षात तेथून कामकाजाला सुरवात करण्याचा प्रयत्न आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, टिळक यांनी कामाची पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या. पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.