मेट्रोची सुनावणी पूर्ण
By Admin | Published: November 14, 2014 12:33 AM2014-11-14T00:33:42+5:302014-11-14T00:33:42+5:30
प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाच्या काही तरतुदींचा समावेश 1987, तसेच पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडय़ात करण्यात येणार आहे.
पुणो : शहरातील मेट्रो प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी, तसेच प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाच्या काही तरतुदींचा समावेश 1987, तसेच पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडय़ात करण्यात येणार आहे. या तरतुदींवरील सुनावणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. या तरतुदींवर सुमारे 5 हजार 4क्क् हरकती आल्या होत्या. या सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी प्रामुख्याने जमिनीवरील मेट्रो आणि चार एफएसआयच्या तरतुदीस विरोध करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मेट्रोवरील तरतुदींवर सुमारे 5 हजर 4क्क् हरकती आल्या होत्या. या हरकती सूचनांची सुनावणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर दिवाळीपूर्वी सुरू करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यात वैयक्तिक हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. तर, दिवाळीनंतर आता दुस:या टप्प्यात सामूहिक सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. या दुस:या टप्प्यात 4 हजार नागरिकांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, त्यातील केवळ 77क् नागरिकच सुनावणीसाठी उपस्थित राहिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या सुनावणीचा अहवाल, प्रशासनाकडून शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात येणार असून, तो समितीच्या मान्यतेनंतर मुख्यसभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
4शहरातील मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि निगडी ते स्वारगेट या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 1क् हजार 769 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात भूसंपादन आणि झोपडपट्टी पुनर्वसनही करावे लागणार आहे. हा निधी उभारण्यासाठी प्रशासनाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या सूचनांनुसार, मेट्रो मार्गाच्या 5क्क् मीटरच्या परिसरात 4 एफएसआय, 5क् मीटर अंतरात ना विकासक्षेत्र, तसेच या मार्गात बांधकाम करण्यासाठी मेट्रोसाठीच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेणो अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.