पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:33 AM2018-06-12T03:33:44+5:302018-06-12T03:33:44+5:30

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे येत्या ७ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत पालखी मार्गांची पाहणी केली.

 Complete the tasks on Palkhi roads - Mukta Tilak | पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक

पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक

Next

पुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे येत्या ७ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत पालखी मार्गांची पाहणी केली. या वेळी रस्ते, फुटपाथ दुरुस्ती व अन्य सर्व प्रकारची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले.
देहू-आळंदी येथून निघणा-या पालखी सोहळ्यात राज्यभरातील लाखो भाविक सहभागी होतात. या दोन्ही पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामासाठी असतात. त्यामुळे पालख्यांचे आगमन झाल्यानंतर वारकºयांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, अशा सूचनादेखील मुक्ता टिळक यांनी अधिकाºयांना दिल्या. या वेळी नगरसेवक प्रकाश ढोरे, शीतल सावंत, सुनीता वाडेकर, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, विशाल धनवडे, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली, राजेंद्र निंबाळकर, सहायक आयुक्त विजय लांडगे उपस्थित होते.
मुक्ता टिळक यांनी कळस-धानोरी, औंध-बोपोडी, संगमवाडी, पाटील इस्टेट, निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा या पालखीतळांची पाहणी केली.
बेवारस गाड्यांचा त्वरित बंदोबस्त करा, कचरा, राडारोडा उचला, खड्ड्यांची डागडुजी करावी, २४ तास पाणीपुरवठा करावा, गरज असेल तेथे पालिकेचे टँकर उपलब्ध करून द्या,
आरोग्याच्या सर्व सुविधा देण्यासाठी यंत्रणेने सज्ज राहा, स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा, मोबाईल टॉयलेट पुरवा, पालिकेच्या शाळा वारकºयांसाठी उपलब्ध करून द्या, पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना महापौर यांनी दिल्या.

Web Title:  Complete the tasks on Palkhi roads - Mukta Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.