अष्टविनायक महामार्गाचे काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:15+5:302021-09-27T04:12:15+5:30

या रस्त्यात रांजणगाव गणपती येथील माळवस्ती, शेळके मळा, लांडेवस्ती व देवकरवस्ती या चार वस्त्या येतात, तसेच हा रस्ता ...

Complete the work of Ashtavinayak Highway | अष्टविनायक महामार्गाचे काम पूर्ण करा

अष्टविनायक महामार्गाचे काम पूर्ण करा

Next

या रस्त्यात रांजणगाव गणपती येथील माळवस्ती, शेळके मळा, लांडेवस्ती व देवकरवस्ती या चार वस्त्या येतात, तसेच हा रस्ता रांजणगाव, सोने सांगवी नागरिकांचा दररोजच्या दळणवळणाचा रस्ता असल्याने रस्त्याची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दरम्यानच्या काळात पाऊस झाल्यामुळे त्या रस्त्याला गुडघाभर पाणी साठले होते. याचा नागरिकांना जाण्या-येण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. तरी संबंधित ठेकेदाराशी बोलून त्या उर्वरित रस्त्याचे काम तत्काळ चालू करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत, अशी मागणी पाचुंदकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.

फोटो: अष्टविनायक महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठीचे निवेदन वळसे-पाटील यांना देताना मानसिंग पाचुंदकर.

260921\img-20210925-wa0174.jpg

अष्टविनायक महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी गृहमंत्री वळसे पाटील यांना निवेदन देताना मानसिंग पाचुंदकर

Web Title: Complete the work of Ashtavinayak Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.