पालखी मार्गांची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:51+5:302021-01-23T04:10:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज ...

Complete the work of palanquin routes by the end of March | पालखी मार्गांची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा

पालखी मार्गांची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

व्हीव्हीआयपी सर्किट हाउस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावे.

Web Title: Complete the work of palanquin routes by the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.