पुरंदरमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

By admin | Published: June 2, 2017 01:57 AM2017-06-02T01:57:38+5:302017-06-02T01:57:38+5:30

आजपासून राज्यातील शेतकरी संपावर गेल्याने पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला; मात्र संपाची

Composite Composite response in Purandar | पुरंदरमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

पुरंदरमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : आजपासून राज्यातील शेतकरी संपावर गेल्याने पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही या संपाला मोठा प्रतिसाद मिळाला; मात्र संपाची नेमकी दिशा न समजल्याने तालुक्यातून या संपाला संमिश्र प्रतिसादच मिळाला आहे; मात्र उद्यापासून तालुक्यात कडकडीत संप पाळण्यात येणार असल्याचे ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शेतकरी संघटनांकडूनही संपात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
आजचा आठवडे बाजार भरलाच नाही, तर भाजी मंडईतही शुकशुकाट होता. सासवड तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज पहाटेपासून मोठा बाजार भरत असतो. दिवे व गराडे परिसरात रस्त्यालगत भाजीपाला व फळविक्रेते बसलेले होते. या परिसरातील दूध संकलन केंद्रातून दूध संकलित करण्यात येत होते.
माळशिरस परिसरात शेतकऱ्यांनी शेतातील माल न तोडता तरकारी बंद ठेवून संपात सहभाग नोंदवला. खळद, शिवरी परिसरातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन संप यशस्वी करण्याचे नियोजन केले. शेतीमालाबरोबरच दूध संकलनही बंद ठेवण्याबाबत सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. उद्यापासून दूध संकलनही बंद राहणार आहे, आज ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले, तर दुधाची वाहतूक करणारे टँकर अडवून दूध ओतून देण्याचाही प्रयत्न झाला. या संपाला कॉँग्रेसचा पूर्णपणे पाठींबा असल्याचे संजय जगताप यांनी सांगितले.

संप : शेतकरी बैठक घेणार

बाहेरगावावरून येणारे व्यापारी येथे माल खरेदीसाठी येत असतात, आज मात्र हा बाजार भरलेला होता. मात्र, शनिवारपासून शेतकरी बाजारात शेतीमाल विक्रीसाठी आणणार नाहीत, दूध संकलनही करणार नसल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले. नीरा येथे ही आज सकाळचा बाजार भरला नव्हता, शेतकरी बाजाराकडे फिरकलेच नाही, परींचे येथे शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रात आज दूध घातले नव्हते, तर संपात सहभाग आणि नियोजनासाठी शेतकरी बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Composite Composite response in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.