कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी संयुक्त मोजणी : भूमी अभिलेखची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 08:20 PM2019-08-26T20:20:12+5:302019-08-26T20:25:38+5:30
राजस सोसायटी ते खडी मशीन चौकादरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी ही मोजणी केली जाणार आहे...
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला हळूहळू वेग येऊ लागला असून पालिकेने या रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या जागांच्या संयुक्त मोजणी प्रक्रियेला सोमवारी सुरुवात केली. राजस सोसायटी ते खडी मशीन चौकादरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी ही मोजणी केली जाणार असून त्यासाठी पालिकेने भूमी अभिलेख कार्यालयाकडे अडीच लाख रुपये भरले आहेत. येत्या गुरुवारपासून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होणार आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कात्रज, कोंढवा, फुरसुंगी, येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी आदी भागातील नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. याभागातील बांधकामाचा वेगही झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत असून प्राणांतिक अपघातांचे प्रमाणही लक्षणिय आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करुन पदर वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव असून त्याच्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली आहे. या रुंदीकरणामध्ये जवळपास अडीचशे मिळकती बाधित होणार आहेत.
बाधित होणाºया खासगी मिळकतींसह सर्वे क्रमांक असलेल्या मिळकतींची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी सर्व मिळकतधारकांना पालिका आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. यासोबतच या संपुर्ण रस्त्यासह आजुबाजूच्या परिसरामध्ये फलकही लावण्यात आलेले होते. सोमवारी ही मोजणी होणार अशा नोटीसा देण्यात आलेल्या होत्या. परंतू, सोमवारी भूमी अभिलेखच्या अधिकाºयांनी या सर्व परिसराची पाहणी केली. येत्या गुरुवार-शुक्रवारपासून प्रत्यक्ष संयुक्त मोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या मोजणीला आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. तारीख बदलण्यात आल्याची माहिती मिळकतधारक व रहिवाशांना कळविण्यात येणार असून तसे फलकही या परिसरात लावले जाणार आहेत. सर्वे क्रमांक पडलेल्या हद्दींसह बाधित होणाºया मिळकतींची मोजणी केली जाणार आहे.
====
टीडीआरसाठी होणार नागरिकांना फायदा
बाधित झालेल्या जमिनींच्या टीडीआर स्वरुपातील मोबदल्यासाठी नागरिक जेव्हा प्रकरणे पालिकेकडे सादर करतील तेव्हा त्यांना पुन्हा नव्याने मोजणी करुन घेण्याची आवश्यकता भासणार नाही. हीच मोजणी ग्राह्य धरुन टीडीआरची प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे नागरिकांना या मोजणीचा फायदाच होणार आहे.
====
रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाºया मिळकती - २५०
एकूण बाधित होणारे क्षेत्र - २ लाख ८८ हजार चौरस मीटर
भूमी अभिलेखकडे पालिकेने भरलेली रक्कम - २ लाख ५० हजार रुपये