शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, ‘एफआरपी’बाबत कारखानदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 01:43 AM2018-07-19T01:43:13+5:302018-07-19T01:43:23+5:30
केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे.
बारामती : केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे. साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी असणारी २५५० रुपये एफआरपी आता दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या एफआरपीबाबत संमिश्र प्रतिक्रिया साखर कारखानदरीच्या क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. हा
निर्णय म्हणजे शेतकºयाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पूर्वी साडेनऊ टक्के असणारा साखर उतारा आता १० टक्के करण्यात आला आहे. या साखर उताºयासाठी केवळ २७५० रुपये ‘एफआरपी’ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी पूर्वी मिळणारी २५५० रुपये एफआरपीचा हिशोब पाहता, प्रत्येक पॉर्इंटला २६८ रुपये मिळत होते. आज झालेल्या निर्णयानुसार अर्धा पॉर्इंट वाढविला. त्यामुळे आज एफआरपीमध्ये २०० रुपये दिसणारी वाढ फसवी आहे. खासगी साखर उत्पादकांच्या दबावाला बळी पडून केलेली ही निव्वळ धूळफेक आहे. अवघे ६६ रुपये शेतकºयाच्या हातात पडणार आहेत.
माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूर्वी १०० रुपयांपेक्षा एफआरपीमध्ये वाढ झाली नाही. मात्र, आज जाहीर झालेल्या एफआरपीनुसार साखर उताºयामध्ये अर्धा टक्का वाढ करण्यात आली असली तरी शाश्वत दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या सरकारने हे निर्णय घेतले नव्हते. या निर्णयाचे स्वागत आहे.
घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितले, की एफआरपीसह साखरेच्या दराचे गणित केंद्र सरकारने निश्चित करावे. अभ्यास गट करून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. एफआरपी ठरविताना साखरेच्या दराचे निर्णय ठरवावे. कारण त्यावर संस्था आणि शेतकºयांचे भवितव्य आहे.