रिंगरोड, पाणी, कचऱ्यासाठी भरीव तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:37 AM2018-03-27T02:37:57+5:302018-03-27T02:37:57+5:30

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या २ हजार ५९१ कोटी रुपयांच्या

Comprehensive provision for ringrocks, water, wastes | रिंगरोड, पाणी, कचऱ्यासाठी भरीव तरतूद

रिंगरोड, पाणी, कचऱ्यासाठी भरीव तरतूद

Next

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या २ हजार ५९१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सोमवारी मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत
विधान भवन येथे पार पडलेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाली. त्यात हिंजवडी मेट्रो, रिंगरोड, पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सेवेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पुणे व मुंबई शहरालगतच्या भागाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, या उद्देशाने पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री पीएमआरडीएचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०१८-१९ या वर्षासाठी एकूण रक्कम रुपये २ हजार ५९१ कोटी ७७ लाख इतक्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते उपस्थित होते.
तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी अधिकारीही उपस्थित होते.
अंदाजपत्रकात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी ८८८ कोटी, रिंगरोडसाठी १ हजार २३५ कोटी, म्हाळुंगे टाऊनशिपसाठी १५२ कोटी, रस्ते व पूल बांधणीसाठी ९९ कोटी, वाघोली पाणीपुरवठा
२५ कोटी, अग्निशमन केंद्र्रासाठी ५० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमआरडीए
कार्यक्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.

पीएमआरडीएच्या विकासकामांसाठी तरतूद
रिंग रोड प्रकल्प : १२३५.३०
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो : ८८८
म्हाळुंगे नगररचना योजना : १५२
प्रादेशिक आराखड्यातील
रस्ते : १२४
अग्निशमक केंद्र विकास : ५०
पीएमआरडीए प्रशासकीय
इमारत : ५०
वाघोली पाणी पुरवठा
योजना : २५
विकास आराखड्यासाठी : २२
कचरा व्यवस्थापनासाठी : १०
पुणे-लोणावळा ‘सब-वे’ : ९
पुरंदर विमानतळ रस्ता जोडणे : ७
इंद्रायणी नदी सुधारणा योजना : ६
इतर प्रकल्पासाठी : १२.९३
(आकडे कोटींमध्ये)

Web Title: Comprehensive provision for ringrocks, water, wastes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.