पुणे महापालिकेच्या ताब्यातील मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणक प्रणाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:30 PM2019-07-17T13:30:51+5:302019-07-17T13:33:24+5:30

महापालिकेच्या मालकीच्या व भूसंपादन करून घेतलेल्या मालमत्तांची नोंद केली जाते. या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचा स्वतंत्र कक्ष आहे

Computer system for management of property owned by Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या ताब्यातील मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणक प्रणाली 

पुणे महापालिकेच्या ताब्यातील मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणक प्रणाली 

Next
ठळक मुद्देअवघ्या तीन कर्मचाऱ्यांच्या मानधनावर वर्षभरात ही रक्कम खर्च होणारएक कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी दिली मंजुरी

पुणे : महापालिकेच्या ताब्यातील मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणकप्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आलेल्या एक कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. अवघ्या तीन कर्मचाऱ्यांच्या मानधनावर वर्षभरात ही रक्कम खर्च होणार आहे. 
महापालिकेच्या मालकीच्या व भूसंपादन करून घेतलेल्या मालमत्तांची नोंद केली जाते. या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेचा स्वतंत्र कक्ष आहे. परंतु, त्याची संगणकीय प्रणाली अद्याप तयार केलेली नव्हती. कोट्यवधी रुपयांच्या जमिनींची देखभाल व व्यवस्थापन हे पालिकेपुढील मोठे आव्हान असते. अनेकदा पालिकेकडेच मालमत्तांची परिपूर्ण माहिती उपलब्ध नसते. पालिकेने बºयाचशा मिळकती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत, तर अनेक मिळकती भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थांना कळविण्यात आले होते. 
......
तीन कर्मचारी नेमणार
या कंपनीच्या सादरीक रणामध्ये मालमत्ता व्यवस्थापनाकरिता संगणकप्रणाली विकसित करण्यासाठी एकूण तीन कर्मचारी नेमणार आहेत. त्यामध्ये मुख्य सल्लागाराचे एक पद व व्यवस्थापकीय सल्लागाराची दोन पदे समाविष्ट आहेत. एक वर्षासाठी मुख्य सल्लागाराला दरमहा ३ लाख २४ हजार रुपये, तर व्यवस्थापकीय सल्लागाराला दरमहा २ लाख ७९ हजार रुपये प्रतिव्यक्ती दर निश्चित केला आहे. त्यानुसार या कामासाठी १ कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. ही प्रणाली विकसित करण्यास तसेच आवश्यकता भासल्यास तीन कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल. 
..........
या कंपन्यांकडून सादरीकरण करून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित केली होती. या समितीमध्ये साख्यिकी विभागाचे प्रमुख, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त यांचा समावेश करण्यात आला होता. 
.......
शासनाने प्राधिकृत केलेल्या विप्रो, केपीएमजी, ग्रॅन्ट थोर्नोट, डिलॉईट, एर्न्स्ट अ‍ॅन्ड यंग आणि पीडब्ल्यूसी या सहा कं पन्यांना या विषयावर सादरीकरण करण्यास ई-मेलद्वारे कळविण्यात आले होते. या सहा संस्थांपैकी केपीएमजी, एर्न्स्ट अ‍ॅन्ड यंग, पीडब्ल्यूसी या कंपन्यांनी सादरीकरण केले. समिती सदस्यांनी एर्न्स्ट अ‍ॅन्ड यंग या कंपनीच्या सादरीकरणाला सर्वाधिक गुण दिले. 

Web Title: Computer system for management of property owned by Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.