कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 02:08 PM2018-01-23T14:08:34+5:302018-01-23T15:09:35+5:30

Comrade Yashwant Chavan passed away at the age of 97 | कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांचं निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next

पुणे/मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचं वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी पुण्यात निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव दादरमध्ये आणला जाणार असून संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्क स्मशाणभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी वयाच्या ९८व्या वर्षी सहकाऱ्यांसमवेत भाकपमध्ये प्रवेश केला होता. वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहात १८ ऑगस्टला विशेष कार्यक्रमात कॉ  चव्हाण यांनी पक्ष व कार्यकर्त्यांना विलीन केले होते. 

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविधतेत एकता या मूल्यांवरच हल्ले होत आहेत. खासगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून कामगारांच्या कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लाल निशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेत चव्हाण यांनी चळवळीच्या नव्या पर्वाला सुरूवात केली होती.  सोव्हिएत क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही एकजूट श्रमिकांच्या चळवळीला प्रेरणादायी ठरत असताना चव्हाण यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झालं आहे.
 

Web Title: Comrade Yashwant Chavan passed away at the age of 97

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.