मांडवगण फराटा येथे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:58+5:302021-04-09T04:10:58+5:30
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे हे उपस्थित ...
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे हे उपस्थित होते. मांडवगण फराटा येथील पुण्याई मंगल कार्यालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी सर्व सुविधांयुक्त कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले. कोविड सेंटर होण्याअगोदर या परिसरातील नागरिकांना ४० ते ५० किलोमीटर लांब जाऊन उपचार घ्यावे लागत होते. जिल्हा परिषदेच्या वतीने लागेल ती मदत या कोविड सेंटरला केली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले.
जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे बोलताना म्हणाले की, मांडवगण फराटा हे पूर्व भागातील मध्यभागी असलेले गाव असल्याने कोविड सेंटरची सोय कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाल्याने येथील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोरोना बाधित रुग्णांना जेवणाबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून सुजाता पवार यांचे काम कौतुकास्पद आहे.
या वेळी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजूषा सातपुते, घोडगंगाचे संचालक शंकर फराटे, बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी कदम,धनंजय फराटे, संभाजी फराटे आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी) मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.
--
--