‘निर्मल वारी’ची संकल्पना यशस्वीचा दावा
By admin | Published: July 16, 2016 01:02 AM2016-07-16T01:02:39+5:302016-07-16T01:02:39+5:30
पालखी सोहळ्यात राज्य शासनातर्फे राबविलेली ‘निर्मल वारी’ची संकल्पना यशस्वी झाल्याचा
कोरेगाव भीमा : पालखी सोहळ्यात राज्य शासनातर्फे राबविलेली ‘निर्मल वारी’ची संकल्पना यशस्वी झाल्याचा दावा या योजनेसाठी पुढाकार घेतलेले श्री क्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी केला आहे.
तुकाराममहाराज संस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीने राज्य शासनाने ३३१व्या पालखी सोहळ््यात निर्मल वारी उपक्रम राबविण्यात आला.
संत ज्ञानेश्वर माऊली तसेच तुकोबारांच्या पालखी सोहळ््यातील मुक्कामांच्या ठिकाणी प्रत्येकी ८०० फिरती शौचालये ठेवण्यात आल्याने सोहळा दुर्गंधीमुक्त झाला, त्याबद्दल वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोर्टेबल शौचालये बसवून ती वापरण्यासाठी वारकरऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
विविध सेवाभावी संस्थांचे ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी केलेले काम आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे शक्य झाले.
यासाठी वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांनी मदत केली. (वार्ताहर)