बर्मिंगहॅमसोबतच पालिका राबविणार ‘न्यूट्रीशिअस फूड ’ संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:13 PM2019-03-15T13:13:10+5:302019-03-15T13:24:07+5:30
शहराच्या कोणत्याही भागातील चौपाटींवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या अभावानेच रिकाम्या दिसतात. चाट पाणीपुरी, पावभाजी, वडापाव पासून ते थेट चायनीज आणि पोळीभाजीपर्यंत सर्वकाही या गाड्यांवर मिळते.
- लक्ष्मण मोरे -
पुणे : शहरातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, स्टॉल्स आदी पथारींजवळील अस्वच्छता, खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तीची स्वच्छता, स्वच्छ परिसर, आरोग्यदायी आणि सकस अन्नपदार्थांचा अभाव ही स्थिती कायमच पाहायला मिळते. खवय्यांना याठिकाणी मिळणारे अन्न सकस आणि स्वच्छता राखून तयार केलेले असेलच असे नाही. ही स्थिती बदलण्यासाठी आणि नागरिकांना पोषक, आरोग्यदायी अन्नपदार्थ खायला मिळावेत यासाठी पथारी व्यावसायिकांचे समुपदेशन केले जाणार आहे. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम महापालिकेच्या सहकायार्ने पुणे महानगरपालिका शहरात मॉडेल राबविणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेच्या नोंदणीनुसार शहरात सध्या २१ हजारांपेक्षा अधिक परवानाधारक पथारी व्यावसायिक आहेत. यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणारे जवळपास साडेपाच हजार पथारी व्यावसायिक आहेत. खवय्ये पुणेकरांसोबतच शिक्षण आणि नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्यात स्थलांतरीत झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. शहराच्या कोणत्याही भागातील चौपाटींवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या अभावानेच रिकाम्या दिसतात. चाट पाणीपुरी, पावभाजी, वडापाव पासून ते थेट चायनीज आणि पोळीभाजीपर्यंत सर्वकाही या गाड्यांवर मिळते. मात्र, हे अन्न सकस, पौष्टीक असेलच असे नाही. तसेच ते स्वच्छतेचे निकष पाळून तयार केलेले असेल याचीही खात्री देता येत नाही. अनेकदा आचारी निरोगी आहे का, त्याला कोणते आजार तर नाहीत ना याचाही विचार नागरिक करीत नाहीत. केवळ चवीवर भाळलेले नागरिक आरोग्याच्या भविष्यात उद्भवू शकणाºया समस्यांकडे दुर्लक्ष करतात.
पुण्याच्या लोकसंख्येप्रमाणेच लोकसंख्या असलेल्या बर्मिंगहॅम महापालिकेलेने यासंदर्भात सर्वेक्षण करुन त्यावर उपाय म्हणून तेथील पथारी व्यावसायिकांचे समुपदेशन करुन स्वच्छतेसंदर्भात तसेच न्यूट्रीशिअस फूड बाबत कार्यशाळा घेण्यासोबतच विविध प्रयोग राबविले. या महापालिकेच्या फूड फाऊंडेशनच्या प्रमुख अॅना टेलर, बर्मिंगहॅम काऊंसिलच्या न्यूट्रीशन अॅन्ड फूडच्या सल्लागार शलीन मालू या दोन अधिकारी महिलांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांची भेट घेऊन हे मॉडेल पुण्यात राबविण्यासंदर्भात चर्चा केली. या कामात फूड फाऊं डेशनला टाटा ट्रस्ट मदत करीत आहे.
====
विविध शाळा, रुग्णालये, कॉलेजेस अशा जेथे जेथे अन्न पुरविले जाते त्याठिकाणी जाऊन अॅना टेलर आणि शलीन मालू भेटी देत आहेत. येथील ह्यफूड हॅबीट् तपासल्या जात आहेत. त्यामध्ये काय त्रुटी आहेत यासंदर्भात चर्चा करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासह अधिकाºयांच्या भेटी घेण्यासोबतच नागरिकांकडून माहिती मिळविली जात आहे. यामधून हेल्थ इंडेक्स तयार केला जाणार आहे.
====
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे नोंदणी झालेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे सुरुवातीला समुपदेशन केले जाणार आहे. त्यांच्या कार्यशाळा घेऊन नागरिकांना सकस, पौष्टीक आणि दजेर्दार अन्न कसे द्यावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी टाटा ट्रस्टची मदत होणार असून टाटाच्या हॉटेल्सचे शेफ मार्गदर्शन करणार आहेत. पथारीच्या जवळील सर्व परिसर अतिशय स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासोबतच तेथील अन्नपदार्थांची चव, तेलाचा वापर, पदार्थांचा दर्जा याविषयीही कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. हातगाड्या, स्टॉल्सवरील अन्नपदार्थ तयार करणाºया आचाºयांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
====
फूड फाऊंडेशनने खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर वापरल्या जाणाºया तेलाचा अभ्यास केला आहे. काही विशिष्ट वेळा वापर झालेले तेल आरोग्यास अतिशय हानीकारक असते. त्यामुळे तेलाचा पुनर्वापर किती प्रमाणात केला जावा यासंदर्भातही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
====
बर्मिंगहॅम काऊंसिल आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी न्यूट्रीशिअस फूड मॉडेल राबविले जाणार आहे. व्यावसायिकांना प्रशिक्षित करणे, त्यांना स्वच्छतेवर भर देण्यास लावणे, अन्न पदार्थ आरोग्यपूर्ण, सकस आणि पौष्टीक असतील, नागरिकांच्या आरोग्याला बाधा येणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. समुपदेशन, प्रशिक्षणाद्वारे नक्कीच बदल घडेल. यासोबतच खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या आचाऱ्यांची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग
====
व्यवसाय प्रकार नोंदणीकृत अन्नपदार्थ विक्रेते
खाद्यपदार्थ विक्रेते 3978
पानपट्टी विक्रेते 627
आईसक्रिम विक्रेते 621
चहा विक्रेते 243
====