स्थापत्य अभियांत्रिकी पदाची परीक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:48+5:302021-03-13T04:21:48+5:30
अभियांत्रिकी परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या चारच केंद्रावर होणार आहे. तर राज्य सेवा पूर्व ३६ केंद्रावर ...
अभियांत्रिकी परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या चारच केंद्रावर होणार आहे. तर राज्य सेवा पूर्व ३६ केंद्रावर होणार आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राज्यसेवा २१ मार्चला आणि अभियांत्रिकी सेवा ही २७ मार्चला आयोजित केली आहे. म्हणजे यामध्ये केवळ ६ दिवसांचा फरक आहे. त्यात काही विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूळ गावी आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्याला आदल्या दिवशी तरी केंद्रावर पोहोचावे लागेल. यामध्येच त्याचे २ ते ३ दिवस जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ प्रवासात जाऊ शकतो. उरलेल्या वेळेत दुसऱ्या परीक्षेची उजळणी होणे शक्य होणार नाही. त्यामुळे आमची संधी वाया जावू शकते. याचा विचार करून अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेत किमान काही दिवसांचव अंतर असावे, असे विद्यार्थांचे म्हणणे आहे.