मधुर गाण्यांनी सजली स्वर मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:59+5:302021-02-11T04:10:59+5:30

पुणे : सत्य शिवाहून सुंदर हे... धुंद एकांत हा...धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना... या सुखांनो या...नवीन आज चंद्रमा...एक धागा सुखाचा ...

Concert decorated with sweet songs | मधुर गाण्यांनी सजली स्वर मैफल

मधुर गाण्यांनी सजली स्वर मैफल

googlenewsNext

पुणे : सत्य शिवाहून सुंदर हे... धुंद एकांत हा...धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना... या सुखांनो या...नवीन आज चंद्रमा...एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे... ही सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली एकाहून एक अप्रतिम गाणी सादर करत रसिकांना सुरेल गीतांची सफर घडवली. गायिका आरती आठल्ये आणि रवींद्र शाळू यांनी गायलेल्या अवीट गोडीच्या गाण्यांनी ‘या सुखांनो या’ ही स्वर मैफल सजली.

स्वच्छंद-आरोही प्रस्तुत ‘या सुखांनो या’ संगीतकार व गायक सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गायलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात केले होते. शिक्षणतज्ञ डॉ. दत्तात्रय तापकीर, राजकुमार सुराणा, धनंजय पुरकर, दत्ता थिटे उपस्थित होते. लॉकडाऊननंतर सादर झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘सत्य शिवाहून सुंदर’ या सुरेल गीताने झाली. त्यानंतर ‘स्वप्नात रंगले मी’, ‘एक धागा सुखाचा’, ‘आकाशी झेप घेरे पाखरा’, ‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’, ‘तुझी माझी प्रित जगावेगळी’ या गाण्यांनी रसिकांना जुन्या काळाची सफर घडवली. ‘आज प्रितीला पंख हे लाभले रे’, ‘झेप घेऊनी पाखरु चालले रे’ गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ‘पडदा लाजंचा लाजंचा’, ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ या गीतांनी बाबूजींच्या आठवणी ताज्या केल्या. सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले. अपूर्व द्रविड, ऋतुराज कोरे, सचिन वाघमारे, यश भंडारे यांनी साथसंगत केली.

Web Title: Concert decorated with sweet songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.