बिबट्याच्या मानवावरील हल्ल्यांबाबत ठोस उपाय करावे लागणार : राहुल कुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:22 IST2024-12-19T13:11:27+5:302024-12-19T13:22:40+5:30
दौंडमधील कडेठाण येथील घटनेबाबत हिवाळी अधिवेशनात उठविला आवाज

बिबट्याच्या मानवावरील हल्ल्यांबाबत ठोस उपाय करावे लागणार : राहुल कुल
वरवंड : दौंड तालुक्यामध्ये कडेठाण येथील घटना बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू ७ डिसेंबर रोजी झाला आहे. त्यानंतर वन विभागाने त्या घटनेच्या ठिकाणी पिंजरा लावला. मात्र त्या पिंजऱ्यामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभाग अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे कडेठाण येथील घटनेबाबत आमदार राहुल कुल यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कडेठाण येथील लता धावडे या शेतकरी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती विधानसभेमध्ये दिली. तसेच यावर ठोस उपाय करावे लागणार आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे.
कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्यांना हल्ला करून तिचा बळी घेतल्याची घटना घडली होती. त्या अगोदर काही दिवसांपूर्वीच बोरीपारधी हद्दीत बिबट्याने सहा महिन्यांच्या बाळाचा बळी घेतल्यानंतर आता तालुक्यातील कडेठाण येथे घटना घडली आहे. दौंड तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, कडेठाण तर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, गणेगाव, सादलगाव, वडगाव रासाई या भागात बिबट्याने तांडव केले आहे.
शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार करणारा बिबट्या आता माणसाचीही दिवसा ढवळ्या शिकार करू लागला आहे. जी भीती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होती ती भीती आता खरं ठरू लागली आहे. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे दौंड तालुक्यात दोघांचा निष्पाप बळी गेला आहे. दौंड तालुक्यातील कडेठाण शेतकरी शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (वय ५०, रा. कडेठाण) यांच्यावर बिबट्या अचानक हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात नेले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला अकरा दिवस उलटूनही अद्याप तो बिबट्या जेरबंद करण्यात आलेला नाही. ही घटना इतकी भयानक होती की, या घटनेबाबत आमदार राहुल कुल यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा केली आहे.