आळंदीत होणार काँक्रीटचे रस्ते

By admin | Published: June 29, 2015 11:44 PM2015-06-29T23:44:38+5:302015-06-29T23:44:38+5:30

नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी शहरातील विद्रूप रस्त्यांना देखणे बनविण्याचा संकल्प सोडला आहे. विविध भागांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.

Concrete Road to Alandi | आळंदीत होणार काँक्रीटचे रस्ते

आळंदीत होणार काँक्रीटचे रस्ते

Next

आळंदी : नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी शहरातील विद्रूप रस्त्यांना देखणे बनविण्याचा संकल्प सोडला आहे. विविध भागांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.
आळंदी शहरातील गल्ली-बोळांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था नागरिकांची डोकेदुखी ठरली होती. आळंदी शहरात कमी क्षेत्र आणि गर्दी जास्त अशी अवस्था असल्याने माणसांच्या गर्दीबरोबरच मोठ्या व अवजड वाहनांमुळे रस्त्यांसह अनेक समस्या प्रलंबित आहेत. देहू फाटा परिसरातील देहू-आळंदी हा प्रमुख पालखीमार्ग, पिंपरी-चिंचवड पालिकेकडून पूर्ण करून घेतला, त्याशिवाय काळेवाडी, इंद्रायणीनगर, महादेवनगर, काळे कॉलनी, चऱ्होली खुर्दकडे जाणाऱ्या भागांतील दोन रस्ते व घुंडरे आळी परिसरातील नव्याने तयार करण्यात आलेला रस्ताही पूर्ण करण्यात आला आहे. न. प. फंडातून नुकतेच घुंडरे आळी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी सुमारे ४४ लाखांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. मात्र ठेकेदार मुसा हकीम यांनी सुमारे ३१ लाख खर्च करून केवळ ९ दिवसांत रस्ता पूर्ण केला. सदर रस्त्याची नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्यासह नगरसेवक राजेंद्र गिलबिले, रमेश गोगावले, आनंदराव मुंगसे, अमोल खैरे, सचिन रानवडे, अजित तापकीर यांनी या कामाची पाहणी केली.(वार्ताहर)

Web Title: Concrete Road to Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.