महात्मा फुलेनगरच्या अंतर्गत रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:04+5:302021-03-07T04:10:04+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक नवनाथ बल्लाळ, नगरसेविका अनिता जगताप यांच्या प्रयत्नातून मार्गी लावण्यात आले. या कार्यक्रमा ...

Concreting of internal roads of Mahatma Phulenagar | महात्मा फुलेनगरच्या अंतर्गत रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण

महात्मा फुलेनगरच्या अंतर्गत रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण

Next

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक नवनाथ बल्लाळ, नगरसेविका अनिता जगताप यांच्या प्रयत्नातून मार्गी लावण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी बारामतीनगरीचे नूतन उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, उपगटनेत्या सविता जाधव, नगरसेविका मयूरी शिंदे, नगरसेवक बिरजू मांढरे, मयूर लालबिगे, बबनराव लोंढे, अल्ताफ सय्यद, सुशील अहिवळे, संतोष सातव, नितीन शेलार, गजानन गायकवाड, माजी नगरसेविका छबुताई अहिवळे प्रभागातील नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक १९ मध्ये सुहासनगर घरकुल लगत मोकळ्या जागेमध्ये बहुउद्देशीय हॉल मोकळ्या जागेत पेवर ब्लॉक बसवणे इतर सुशोभीकरणचे काम होणार आहे. तसेच पोस्ट आॅफिस समोरून सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करण्याचे काम व फलटण रोड शिक्षक सोसायटीमधील ओपन पेस जागेमध्ये उद्यान विकसित करणे हे सर्व कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. सर्वच कामांचा अंदाजपत्रक तयार करण्याचे काम चालू आहे. या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दलितवस्ती निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रभाग क्रमांक १९ मध्ये उर्वरित सर्वच विकासकामे थोड्याच दिवसात मार्गी लागतील, अशी माहिती नगरसेवक बल्लाळ यांनी दिली. उपमुख्यमंत्री पवार यांच्यामुळे हे काम मार्गी लागल्याचे बल्लाळ म्हणाले.

फोटो ओळी : बारामती शहरातील महात्मा फुलेनगर येथील काँक्रिटीकरणाची सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक नवनाथ बल्लाळ आणि अन्य.

०६०३२०२१-बारामती-०२

Web Title: Concreting of internal roads of Mahatma Phulenagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.