भोरच्या मुख्याधिकारी बंगल्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:15+5:302021-02-15T04:10:15+5:30
भोर: येथील नगरपलिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्याची वापराविना दुरवस्था झाली आहे. बंगल्याची दारे खिडक्या खराब झाले आहेत. गेल्या दहा वर्षापासून ...
भोर: येथील नगरपलिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्याची वापराविना दुरवस्था झाली आहे. बंगल्याची दारे खिडक्या खराब झाले आहेत. गेल्या दहा वर्षापासून या बंगला कोणीही वास्तव्य करत नसल्याने हा बंगला तळीरामांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे या बंगल्याची दुरुस्ती करून संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
भोर नगरपालिकेने मुख्याधिकाऱ्यांना राहण्यासाठी २५ ते ३० वर्षापूर्वी शंकरहिल येथे बंगला बांधण्यात आला होता. तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड, मारुती गायकवाड यांच्या कार्यकाळापर्यंत या बंगल्याचा वापर करण्यात येत होता. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून या बंगाल्यामध्ये कोणीही राहत नाही. त्यामुळे बंगल्याची दारे, खिडक्यांची मोडतोड झाली आहे. छप्पर तसेच संरक्षक भिंतही खराब झाली आहे. बंगल्यात कोणीच नसल्याने मोकाट जनावरेही या ठिकाणी आढळतात.
बंगल्यात वास्तव्यास कोण नसल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी तळीरामांची मैफल सजलेली दिसते. या ठिकाणी पाणी फिल्टर प्लँट असून पाण्याच्या टाक्यात आहेत. असे असताना नगरपालिकेने एक संरक्षक भिंत या ठिकाणी बांधण्याची तसदी घेतली नाही. वा काणेतीही सुरक्षा यंत्रणा तेथे अस्तित्वात नाही. रात्री अपरात्री कोणीही या ठिकाणी येऊन पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेत बाधा आणू शकतात. या ठिकाणी बाग होती. मात्र, त्यामध्ये सुधारणा न करता बागच पालिकेने काढून टाकली आहे. एकूणच केवळ पालिकेच्या दुर्लक्षामुळे या बंगाल्याची दुरवस्था झाली असून याकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. दरम्यान, या बंगल्याची दुरुस्ती करावी तसेच संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
१४ भाेर नगरपालिका
भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी राहणाऱ्या बंगल्याची झालेली दुरवस्था.