महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:28+5:302021-07-09T04:08:28+5:30
भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा शुभारंभ मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ...
भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा शुभारंभ मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी काळे बोलत होते. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शेतकऱ्यांना ८४ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले. १४ हजार कोटी नवीन अनुदान खतासाठी दोन दिवसांपूर्वी दिले. भारतीय जनता पक्षाची ताकद महाराष्ट्रात वाढायला लागली. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघाल्याने १२ आमदारांना निलंबित केले.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात म्हणाले की, बटाटा पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी कृषी आयुक्तांना पत्र दिले आहे. सन २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८७ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला. त्याचे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू शकतात. परंतु विरोधक विनाकारण केंद्र सरकारच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे यांची मनोगते झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी, तर आभार डॉ. ताराचंद कराळे यांनी मानले.