मारुंजीत सापडलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 02:11 PM2018-02-08T14:11:48+5:302018-02-08T14:12:00+5:30
मारुंजीत मोकळ्या मैदानात उघड्यावर बेवारस अवस्थेत आढकलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती आता अत्यंत उत्तम असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.
वाकड : मारुंजीत मोकळ्या मैदानात उघड्यावर बेवारस अवस्थेत आढकलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती आता अत्यंत उत्तम असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. येथील स्थानिक तरुण, पोलीस आणि डॉक्टरांनी दाखविलेल्या समय सुचकतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने तीचे प्राण वाचविण्यात यश आलेलं आहे.
याबाबत हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी साडे चारच्या सुमारास स्त्री दोन दिवस वयाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्या नकुशीच्या रडण्याच्या आवाजाने येथील स्थानिक तरुण रवी यांनी नियंत्रण कक्षाला कळविले घटनास्थळी दाखल झालेल्या हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी, पोलीस हवालदार बाबा क्षिरसागर, रश्मी धावडे,सदाशिव पवार यांनी तातडीने नकुशला एका कपड्यात गुंडाळून औंध रुग्णालयातील एनएसयुआय सेंटर मध्ये दाखल केले नकुशीला तातडीने उपचार मिळाल्याने ती आता सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुरुष अर्भकापेक्षा स्त्री जातीच्या अर्भकात रोग प्रतिकार क्षमता अधिक असते याचाच फायदा नकुशीला झाला आणि यातून ती सुखरूप बचावली अन्यथा जंगली अथवा श्वानांनी तिच्यावर हल्ला चढविला असता असे डॉक्टरांनी सांगितले.