निरगुडसर येथे शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्राचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:08+5:302021-09-10T04:14:08+5:30
शेती व्यवसाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार, असे उपहासाने म्हटले जाते. मात्र, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन नियोजनबद्ध प्रयत्न केले तर ...
शेती व्यवसाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार, असे उपहासाने म्हटले जाते. मात्र, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन नियोजनबद्ध प्रयत्न केले तर शेती व्यवसायात यश निश्चितच मिळते. याची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. हेच निरगुडसर येथील शेतकरी कैलास पांडुरंग वळसे-पाटील यांनी तिसऱ्यांदा ऊस शेतीचे नियोजन करून उत्तम पीक घेऊन दाखवले आहे. त्यांच्याच शेतावर या शेतकरी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कमीत कमी उत्पादन खर्च कसा राहिल, याचाही विचार करण्यात आला. दर्जेदार जैविक खते, कीटकनाशके यांचा वापर करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचे उत्पन्न वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेती मित्र ॲग्रोटेक कृषी समृद्ध भारत संकल्पनेचे अकबर पटेल यांनी केले. यावेळी चेअरमन सुरेश टाव्हरे, कैलास वळसे-पाटील, प्रकाश वळसे, सुनील वळसे, गणेश हिंगे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अशोक भोर व शेतकरी उपस्थित होते.