मैदानी खेळाची कामगिरी उंचावण्यासाठी परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:23+5:302021-03-26T04:11:23+5:30
ही दोन दिवसाची परिषद आभासी पद्धतीने झूम या इंटरनेट प्रणालीद्वारे आयोजिली होती. शारीरिक शिक्षण शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, प्रशिक्षक, ...
ही दोन दिवसाची परिषद आभासी पद्धतीने झूम या इंटरनेट प्रणालीद्वारे आयोजिली होती. शारीरिक शिक्षण शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, प्रशिक्षक, संशोधक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी इत्यादी सहभागी झाले होते.
या ऑनलाइन परिषदेत पहिल्या दिवशी नॅन्सी क्लार्क, डॉ. अतुल गायकवाड, तर दुसऱ्या दिवशी डॉ. डोनवन पिलाई, सुनंदन लेले, डॉ. जानकी देवळे, डॉ. अजित मापारी व डॉ. तन्मयी जोशी आदी नामवंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती मार्गदर्शन केले. तसेच या वेळी संशोधन पेपरही सादर केले गेले.
या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यानंतर या परिषदेविषयी माहिती चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांनी दिली.
या परिषदेसाठी समन्वयक डॉ. योगेश बोडके (संघटन सचिव) सहायक प्राध्यापक यांनी काम पाहिले.