लसीकरणाचा गोपनीय डेटा भाजपा नगरसेवकांकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:33+5:302021-05-22T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लसीकरण करणाऱ्या नागरिकांची सर्व गोपनीय माहिती महापालिकेतील भाजपा नगरसेवकांंना राजकीय हेतूने पुरवली जात असल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लसीकरण करणाऱ्या नागरिकांची सर्व गोपनीय माहिती महापालिकेतील भाजपा नगरसेवकांंना राजकीय हेतूने पुरवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. यासंदर्भात त्यांनी सायबर सेलच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे.
येरवडा येथील भाजपाचे नगरसेवक बापूराव कर्णे यांचे नाव जगताप यांनी तक्रारीत नमूद केले आहे. ते त्यांच्या मुलाच्या मोबाईलवरून त्यांच्या प्रभागातील लसीकरण झालेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमाकांवर स्वतःच्या नावाचे प्रचारपत्रक पाठवत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. भाजपाच्या किती नगरसेवकांनी हा प्रकार केला आहे, त्यांंना प्रशासनातील कोण ही माहिती देत आहे, याची चौकशी करावी. तसेच कर्णे पितापुत्रावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांंनी सायबर सेलकडे केली आहे.