रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश; लवकरच होणार कार्यवाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 07:16 AM2020-12-29T07:16:00+5:302020-12-29T07:20:02+5:30

शहर व ग्रामीणमध्ये १४ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांची माहिती..

Confiscation order of Ravindra Barhate's property; Action to be taken soon | रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश; लवकरच होणार कार्यवाही 

रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीचे आदेश; लवकरच होणार कार्यवाही 

Next

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची कार्यवाही न्यायालयाने सुरु केली आहे. बऱ्हाटे विरुद्ध पकड वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानंतरही तो मिळून आलेला नाही. त्यानंतर न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी जाहीरनाम्याचा आदेश काढून तो पुणे शहर व परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केला होता. तरीही तो न मिळून आल्याने आता स्थावर मालमत्त जप्तीचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करुन घेऊन पुढील कार्यवाही पुणे पोलीस करीत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, तथाकथीत पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह १३ जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानूसार (मोक्का) कारवाई केली आहे. हडपसर येथील गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे टोळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हडपसरच्या गुन्हयासह त्याच्याविरुध्द शहर व ग्रामीणमध्ये १४ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द पहिला गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात ७ जुलै २०२० रोजी दाखल झाला होता. बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने केली होती. त्यानंतर १२ जुलै रोजी समर्थ पोलीस ठाण्यातही एका बांधकाम व्यवसायिकाला धमकावून त्याच्याकडून ७२ लाख रुपये घेऊन आणखी पावणेदोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर तिसरा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यामध्ये कोथरुड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केली होती. तर चौथा गुन्हा केटरींग व्यवसायीकाने दाखल केल्यावरुन हडपसर पोलीस ठाण्यातच दाखल झाला होता. बहुतांश गुन्हयात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटीतपणे कट रचून नागरिकांना धमकावणे, खंडणी मागणे, मालमत्ता बळकाविणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
..........

दरम्यान हडपसर केटरींग व्यवसायीकाने दाखल केलेल्या गुन्हयात बऱ्हाटे टोळीतील फरार असलेला आरोपी गणेश मधुकर आमंदे(वय ४५, रा.टिळक रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलीस नाईक मोहसिन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्हयामध्ये आजवर ६ आरोपी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी दिली.

Web Title: Confiscation order of Ravindra Barhate's property; Action to be taken soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.