‘रायसोनी’च्या संचालकांवर येणार जप्ती
By admin | Published: March 18, 2016 03:19 AM2016-03-18T03:19:58+5:302016-03-18T03:19:58+5:30
अवसायनात काढण्यात आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पंतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता जप्ती करून, त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी
पुणे : अवसायनात काढण्यात आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पंतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता जप्ती करून, त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव अवसायक जितेंद्र कंडारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रस्तावात संचालकांच्या २६ मालमत्तांच्या जप्तीची शिफारस करण्यात आली आहे.
रायसोनी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे बँक बंद करण्यात आली होती. राज्याच्या विविध भागांमध्ये शाखा असणाऱ्या या पतसंस्थेत २८ हजार खातेधारक आणि ठेवीधारकांचे सुमारे १२०० कोटी रुपये अडकले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र जनसंग्राम संघटनेच्या वतीने येत्या २७ मार्चला दुपारी १२ वाजता कौन्सिल हॉलच्या बाजूच्या आयबी गेस्ट हाऊस येथे ठेवीदारांची बैठक बोलविली आहे, अशी माहिती ठेवीदार समन्वय समितीचे राज्य संघटक दामोदर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पावटेकर व समन्वयक सचिन पार्टे यांनी दिली.
२६ मालमत्ता जप्तीची शिफारस
याप्रकरणी सहकार खात्याने पतसंस्थेची चौकशी करून
त्यावर अवसायक नेमला होता. एमपीआयडी कायद्यानुसार अवसायक जितेंद्र कंडारे यांनी बँकेच्या संचालकांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा आणि ठेवीदारांचे
पैसे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या प्रस्तावात संचालकांच्या २६ मालमत्तांच्या जप्तीची शिफारस करण्यात आली आहे.
यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली जाणार असून, या समितीच्या माध्यमातून मालमत्तांची जप्ती व विक्रीची कारवाई केली जाईल.