बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध, ठेकेदारधार्जिणा निर्णय रद्द करा, महापौर, आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:49 AM2018-03-07T03:49:02+5:302018-03-07T03:49:02+5:30

पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये, याबाबतचे निवेदन मंगळवारी महापौर, महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

 Conflict of Balgandharbhar Rangamandir, cancel the contractor's decision, request for mayor, commissioner | बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध, ठेकेदारधार्जिणा निर्णय रद्द करा, महापौर, आयुक्तांना निवेदन

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध, ठेकेदारधार्जिणा निर्णय रद्द करा, महापौर, आयुक्तांना निवेदन

Next

पुणे - पुण्याचे आभूषण आणि रंगभूमीचा आधार असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. हे रंगमंदिर पाडू नये, याबाबतचे निवेदन मंगळवारी महापौर, महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
या वेळी बाबासाहेब पाटील (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ, अभिनेत्री माधवी मोरे, आरती शिंदे, काव्या शिंदे, ज्योती बोरावके, कल्याणी वाडेकर, अभिनेता योगेश सुपेकर, आशुतोष वाडेकर, विनोद धोकटेकर, संदीप पळीवाले, नितीन मोरे, दीपराज जाधव, एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष राहुल भालेराव, निर्माते माणिकशेठ बजाज, दिग्दर्शक चंद्र्रकांत दुधगावकर, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी, सिने-नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडणे, हा पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करणारा आणि ठेकेदारधार्जिणा निर्णय आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याच्या नव्हे, तर राज्याच्या रंगभूमी चळवळीचे स्मृतिमंदिर आहे.
शहरात प्रत्येक भागात रंगमंदिरे उभी राहिलेली आहेत, आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यापेक्षा त्याचे जतन करणे गरजेचे आहे. या रंगमंदिराच्या वास्तुतून दिग्गज कलाकार तयार झाले आहेत. या वास्तूचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. ही वस्तू पडण्याचा घाट घातला जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात होणारे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम न थांबविता आणि त्यात खंड न पाडता त्या पद्धतीचे नियोजन करून बांधकाम करावे. बालगंधर्व रंगमंदिरातील मोकळी जागा
आहे तिचा नवीन थिएटर
उभारताना वापर करावा, असे मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ यांनी सांगितले.
पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणालकुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले यांना निवेदन सादर केले.

जीएसटीमुळे कलाकारांचे जीवनमान अडचणीत
पु. ल. देशपांडे यांनी स्वत: उभे राहून बालगंधर्व रंगमंदिराचे काम पाहिले होते. पुलंच्या कल्पनेतून साकारलेले हे रंगमंदिर पडल्यास तत्कालीन कलाकारांच्या भावनांचा अपमान होईल. जीएसटी करप्रणाली आपल्यापासून सामान्य कलाकारांचे जीवनमान अडचणीत आहे. वाटते हे रंगमंदिर पाडून नव्याने बांधणे यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी जाणार असून, अनेक नाटकांचे व्यावसायिक प्रयोग बंद होऊन कलाकारांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ येऊ शकते. सद्य:स्थितीत असलेले बालगंधर्व रंगमंदिर उत्तम व सुस्थितीत असून, त्यामध्ये कामे करणे आवश्यक आहे, याकडे बाबासाहेब पाटील यांनी लक्ष वेधले.

Web Title:  Conflict of Balgandharbhar Rangamandir, cancel the contractor's decision, request for mayor, commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे