टाेळक्यातील भांडणाचा नागरिकांना त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 07:26 PM2019-06-07T19:26:54+5:302019-06-07T19:28:55+5:30
नाचताना धक्का लागला म्हणून टाेळक्यांमध्ये भांडणे झाली. यात टाेळक्यांनी इतर नागरिकांना देखील मारहाण केली.
पुणे : रमझान ईद निमित्त आयाेजित कार्यक्रमात नाचताना एकमेकांना धक्का लागला म्हणून टाेळक्यांची आपआपसात भांडणे झाली. या भांडणात टाेळक्यांनी धारदार शस्त्रांचा वापर केला. तसेच रागाच्या भरात त्यांनी इतर नागरिकांना मारहाण करत गाड्यांची माेडताेड केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण बाबुराव चव्हाण (वय 21, रा. गुजरवाडी, कात्रज), साेहेल खलीत सैय्यद (वय20, रा. संताेषनगर कात्रज) अशी आराेपींची नावं असून त्यांना पाेलिसांनी अटक केली आहे. या दाेघांबराेबरच इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी विपुल पंडित (वय 21, रा. गुजरवाडी) यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमझान ईद निमित्त जाधवनगर येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. साऊंड सिस्टीम लावून तरुण नाचत हाेते. यावेळी नाचताना धक्का लागल्याने टाेळक्यांमध्ये वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी आराेपींनी धारदार शस्त्रे काढून भांडणे केली. या भांडणामध्ये इतर नागरिकांचा संबंध नसताना त्यांना देखील टाेळक्यांनी मारहाण केली. विपुल त्यांचा भाऊ अतुल पंडीत तसेच वस्तीतील अस्मिता शिंदे, रामा हवाले यांचा या भांडणाशी काहीएक संबंध नसताना टाेळक्यांनी धारदार शस्त्रांनी यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच गाड्यांची देखील ताेडफाेड केली.
दरम्यान पाेलिसांनी आराेपींना काेर्टात हजर केले असता काेर्टाने आराेपींना 11 जून पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक एस. एस. लाड अधिक तपास करत आहेत.