कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच

By admin | Published: March 31, 2017 11:55 PM2017-03-31T23:55:38+5:302017-03-31T23:55:38+5:30

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने

Conflicts continue until the debt forgiveness is received | कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच

कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच

Next

बावडा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने कर्जमाफीसाठी संघर्ष करावाच लागणार आहे. कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सरकारविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे मंगळवारी (दि. २८) सभेत बोलताना दिला आहे.
बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे १६.५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची भूमिपूजने हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये लागतील. राज्य सरकारविरोधात संघर्ष करून कर्जमाफी जाहीर करण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडू, असा आत्मविश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखविला. या वेळी गावातील आंबेडकर चौक ते काळेश्वर मंदिर व हनुमाननगर येथे रस्ता काँक्रिटीकरण व भैरवनाथ मंदिर घोडे ठेवणेसाठी सभामंडप बांधणे या कामांचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. प्रारंभी बावडा ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या रत्नप्रभादेवी पाटील व पंचायत समितीच्या सदस्या रोहिणीताई घोगरे यांचा सत्कार सरपंच निरूपमा शिंदे, उपसरपंच अमोल घोगरे यांनी केला.
पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या वतीने निघत आहे. या संघर्ष यात्रेचा शुभारंभ बुधवारपासून (दि. २९) होत आहे. या कार्यक्रमास मी उपस्थित राहणारआहे. या वेळी प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, श्रीमंत ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच निरुपमा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. आनंदराव पाटील हे होते. अमर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले. तर चाँद सय्यद यांनी आभार मानले.
संपूर्ण बावडा गाव १०० टक्के निर्मलग्राम झाले आहे. गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांनी झटून चांगले काम केले. शौचालयांच्या १०० टक्के वापरासाठी आगामी काळात सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे भगवान घोगरे, अंबिका पावसे, योगेश जगताप, बाळासाहेब जाधव, उत्तम मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांशी भेटून आम्ही केली आहे. शेटफळ तलावाचे पाणी हे शेतकऱ्यांना बंद पाईपलाईनने देणेकरिता जलसंपदा विभागाने वनगळी येथील एस. बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला डिझाईन व प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. बंद पाइपलाइनमुळे शेतकऱ्यांना जादा आर्वतने मिळतील,
- हर्षवर्धन पाटील

Web Title: Conflicts continue until the debt forgiveness is received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.