दीड लाखाव्यतिरिक्त थकीत रक्कम कशी भरावी?, शेतकरी कर्जमाफीच्या पात्रता निकषांबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 12:17 AM2018-09-28T00:17:30+5:302018-09-28T00:17:49+5:30

छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे.

Confusion about the eligibility criteria of the farmers' debt waiver | दीड लाखाव्यतिरिक्त थकीत रक्कम कशी भरावी?, शेतकरी कर्जमाफीच्या पात्रता निकषांबाबत संभ्रम

दीड लाखाव्यतिरिक्त थकीत रक्कम कशी भरावी?, शेतकरी कर्जमाफीच्या पात्रता निकषांबाबत संभ्रम

googlenewsNext

उरुळी कांचन : छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. या योजनेत थकबाकी भरून कर्जमाफीस पात्र ठरण्यास शेतकºयांकडे काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. मात्र, या योजनेत कुटुंबातील किती खातेदारांना पात्र ठरविले जाणार, याची योग्य माहिती कोणताही अधिकारी उपलब्ध करून देत नसल्याने शेतकºयांच्या मनात थकीत रक्कम भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा सुरुवातीचा अध्यादेश काढला होता. कालांतराने कर्जमाफीची व्याप्ती वाढवून १ एप्रिल २००१ पासून ते ३१ मार्च २००८, १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६, १ जून २०१६ व त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने कर्जाची माहिती मागविली आहे.
दरम्यान थकीत असलेल्या शेतकºयांना दीड लाख व कर्ज मुदतीत परतफेड करणाºयांना २५ हजार प्रोत्साहन अनुदान या निकषानुसार लाभार्थी पात्र ठरविले आहेत. नंतर कौटुंबिक मर्यादा व्याप्ती आणखी वाढवून पती व पत्नीच्या नावे दीड लाख रुपये थकीत कर्ज असल्यास, अशा कुटुंबीयांना लाभ देण्याचा निर्णय झाला होता.
त्यानुसार लाभार्थ्याला
दीड लाखावरील थकीत कर्ज भरण्यासाठी शासनाने तिसºयांदा मुदतवाढ दिली, ती ३० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, राज्य सरकारने सुधारित अध्यादेश काढला. त्यानुसार जिल्हा बँका, सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका या वित्तीय संस्थांकडून अध्यादेशात किमान कुटुंबातील किती व्यक्तींना योजनेत लाभार्थी करण्यात येईल, याची स्पष्ट माहिती संबंधित संस्थांच्या अधिकाºयांकडून मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. कर्जमाफीसाठी कर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपल्याने कर्जमाफी हुकते की काय, या भीतीने शेतकरीवर्ग
धास्तावला आहे.

पती, पत्नी व अल्पवयीन मुलेच पात्र : कटके

या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) अनंत कटके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने ठरविलेल्या निकषानुसार एका कुटुंबाला लाभ मिळण्यासाठी पती, पत्नी व दोन अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुले यांच्यासाठी कर्जमाफीचा नियम ग्राह्य धरण्यात आला आहे.

कुटुंबातील एक व्यक्ती, पत्नीव्यतिरिक्त इतर सज्ञान व्यक्ती असल्यास ते कौटुंबिक नियमाच्या अंतर्गत येणार नाहीत. कर्जमाफीची थकबाकी भरणा करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३० सप्टेंबरपर्र्यंत मुदतीत लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

अधिकाºयांकडून केवळ थकीत रकमेची माहिती देणे अथवा खात्यावरील रक्कम भरून घेणे याव्यतिरिक्त अधिक माहिती मिळत नसल्याने या कर्ज खात्यावरील दीड लाख रुपये माफ होतील की नाही, याबाबत शेतकरी आज तरी अनभिज्ञ आहे.
ही मुदत ३० सप्टेंबरला संपत असल्याने शेतकºयांनी रक्कम भरण्यासाठी हेलपाटे घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, कुटुंबातील किती व्यक्तींंना कर्जमाफीचा लाभ होईल, याची अधिकृत माहिती नसल्याने तो द्विधावस्थेत सापडला आहे.

Web Title: Confusion about the eligibility criteria of the farmers' debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.