राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी संभ्रमावस्था

By admin | Published: February 11, 2015 01:03 AM2015-02-11T01:03:25+5:302015-02-11T01:03:25+5:30

कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येणार आहेत. या चर्चेतून ते शहरातील पक्षाची

The confusion about Raj Thackeray's visit | राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी संभ्रमावस्था

राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी संभ्रमावस्था

Next

मिलिंद कांबळे, पिंपरी
कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येणार आहेत. या चर्चेतून ते शहरातील पक्षाची स्थिती समजून घेणार आहेत. असे असले, तरी ते नक्की येणार का, हा प्रश्न पक्षाचे कार्यकर्तेच विचारू लागले आहेत.
ठाकरे हे १६ फेबु्रवारीला शहरास भेट देणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी पुण्यापाठोपाठ ते येथे येणार होते. मुलीचा अपघात झाल्याने त्यांनी दौरा रद्द केला. या प्रकारे अनेकदा
त्यांनी पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला दुय्यम स्थान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात अनेक जाहीर सभा घेतल्या. मात्र, शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहरात येणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. यामुळे ते शहरातील पक्षबांधणीबाबत गंभीर नसल्याचा समज कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. ही पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. तसेच, अनेक पदाधिकाऱ्यांनी लोकसभा आणि विधानसभेत पक्षविरोधी काम उघडपणे केले. प्रचारासाठी काही जण बाहेरच पडले नाहीत. असे असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. यामुळे पक्षात शिस्त आहे की नाही यावर शंका निर्माण होत आहे. यावर कार्यकर्ते प्रश्न विचारत आहेत.
पक्ष बांधणीकडे पूर्वीपासूनच वरिष्ठांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जुने कार्यकर्ते नाराज असून, ते पुढे येण्याचे टाळतात. काही पदाधिकारी फुटकळ आंदोलन करतात आणि प्रसिद्धी मिळवतात. पद नसलेले अनेक कार्यकर्ते पक्षाचे लेटरहेड आणि व्हिजिटिंग कार्ड छापून बातम्या प्रसिद्ध करुन घेत चमकोगिरी करीत आहेत. या आधारे ‘स्वतंत्र उद्योग’ केले जात आहेत. अशा चमको कार्यकर्त्यांना लगाम लावला जात नाही. उलट तेच वरिष्ठांशी सलगी ठेवून असल्याचे चित्र आहे.
ही स्थिती पाहून, पक्षनेत्यांवरील कार्यकर्त्यांचा विश्वास कमी होत आहे. ठाकरे शहरात नक्की येणार का असा सवाल पक्षाचे कार्यकर्तेच विचारु लागले आहेत. ठरावीक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन ही तारीख जाहीर केली आहे. ते नेहमीप्रमाणे आलेच नाहीत, तर, लांडगा आला रे आला ... अशी गत होऊ नये, असेच सच्च्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
ठाकरे हे शहर भेटीत येत आहेत. शहरातील समस्या जाणून घेण्याचा त्याचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१७ची महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चर्चेनंतर ते निर्णय घेऊन मुंबईतून शहर कार्यकारिणी जाहीर करतील, असे दिसते.

Web Title: The confusion about Raj Thackeray's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.