कोविड केअर सेंटरमधील रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:14+5:302021-05-05T04:15:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार शहरातील खासगी कोविड केअर सेंटरमधील आॅक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर ...

Confusion about the supply of remedicivir injection at Covid Care Center | कोविड केअर सेंटरमधील रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती

कोविड केअर सेंटरमधील रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार शहरातील खासगी कोविड केअर सेंटरमधील आॅक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मागणीनुसार द्यावे लागणार आहे़ परिणामी महापालिकेला प्रथम या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत का, याची शहानिशा करणे अपरिहार्य ठरणार आहे़ त्यानंतर खरी कसरत पुढे राहणार असून, कोणत्या सीसीसीला मागणीनुसार प्राधान्यक्रम द्यायचा, कोणाचे आदेश ऐकायचे, कोणाला नाकारायचे आदी डोकेदुखी आता आरोग्य अधिकाऱ्यांपुढे वाढणार आहे़

खाजगी कोविड केअर सेंटर (सीसीसी) मधील आॅक्सिजनवरील रूग्णांना, राज्य शासनाच्या कोविड-१९ टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एमबीबीएस डॉक्टरांकडूनच रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे़, असे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने नुकतेच जारी केले आहेत़ तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने हे इंजेक्शन वितरण करण्याचे अधिकार महापालिकेला दिले असल्याने, मुळात महापालिकेकडेच सदर इंजेक्शन तुटवडा असताना खाजगी सीसीसीला हे इंजेक्शन कुठून पुरवठा करायचा असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे़

महापालिका हद्दीत सद्यस्थितीला ३१ खाजगी सीसीसी कार्यरत असून, येथे एकूण ४७९ आॅक्सिजन बेड आहेत़ आता राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार येथील आॅक्सिजन बेडवरील रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मागणीनुसार द्यावे लागणार आहे़ त्यामुळे महापालिकेने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या भागातील खासगी कोविड केअर सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टर खरोखरच नियुक्त आहेत का, याची शहानिशा करण्यास सांगितले आहे़

दरम्यान, शहरातील ज्या खाजगी कोविड केअर सेंटरला महापालिकेने परवानगी दिली आहे, तेथील रुग्णांवरील उपचाराबाबतची सर्व जबाबदारी महापालिकेकडून सीसीसी चालक व तेथे नियुक्त असलेल्या एमबीबीएस डॉक्टरकडून हमीपत्रावर घेतली जाणार आहे़

---------------------

खाजगी सीसीसी आवश्यक पण

रूग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी शहरातील खाजगी सीसीसी आवश्यक असल्याचाही मतप्रवाह योग्य आहे़ परंतु, काही सीसीसीकडून कोविड रुग्णांना अव्वाच्या सव्वा पैसे दिवसाला घेतले जात असल्याच्या तक्रारीही आहेत़ त्यामुळे हे सीसीसी म्हणजे पैसे उकळण्याचे साधन असून, त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागात छोट्या क्षमतेने तरी कोविड केअर सेंटर उभे करणे गरजेचे आहे़

- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

----------------------------

शहरातील खाजगी कोविड केअर सेंटरमधील व्यवस्था पाहण्याचे आदेश क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे़ तसेच त्यांच्याकडून या सीसीसीमध्ये एमबीबीएस डॉक्टर नियुक्त आहे का, आॅक्सिजन बेड असेल तर तेथील व्यवस्था सुस्थितीत आहे का याचीही तपासणी करण्यात येणार आहे़

- डॉ़ आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

------------------------------------

Web Title: Confusion about the supply of remedicivir injection at Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.