विमान प्रवाशांमध्ये चाचणीबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:27+5:302020-11-26T04:27:27+5:30
पुणे : दिल्ली, गुजरात, राजस्थान व गोवा राज्यातून विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. पण ...
पुणे : दिल्ली, गुजरात, राजस्थान व गोवा राज्यातून विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. पण अन्य शहरांमध्ये विमानात बसलेल्या प्रवाशांना या राज्यातील विमानतळांवर एक थांबा घेऊन पुण्यात यायचे असल्यास त्यांनाही चाचणी बंधनकारक आहे. तसेच एका दिवसांत या राज्यांतून परतणाऱ्या प्रवाशांनाही चाचणी करावी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातमध्ये दिल्ली, गुजरात, राजस्थान व गोवा या राज्यातून विमान, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्यांना चाचणी बंधनकारक केली आहे. बुधवार (दि. २४) पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असेल. पुणे विमानतळावर प्रत्येक प्रवाशांकडील चाचणीचा रिपोर्ट पाहिला जाणार आहे. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांच्यासाठी विमानतळावरच चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रवाशांना १६०० रुपये दर आकारणी केली जाईल. चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर प्रवाशांना घरी जाता येणार आहे. चाचणीच्या रिपोर्टनुसार प्रवाशांशी संपर्क केला जाणार आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रवाशांमध्ये मात्र चाचण्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही प्रवाशांनी याबाबत टिष्ट्वटरद्वारे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘पुण्यातून जयपुरला गेल्यानंतर ४८ तासांतच पुन्हा पुण्यात परतणार आहे. त्यासाठी चाचणी आवश्यक आहे का’, असा प्रश्न एका प्रवाशाने उपस्थित केला आहे. ‘काही विमाने अन्य शहरांतून या राज्यांमध्ये एक थांबा घेऊन पुण्यात येतात. अशा प्रवाशांनाही चाचणी करणे बंधनकारक असेल का,’ अशी विचारणाही प्रवाशांनी केली आहे. दरम्यान, या चारही राज्यांतून येणाºया विमानांमधील प्रवाशांना चाचणी बंधनकारक असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
----------------