कॉपी निरंक अहवालावर साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 04:27 AM2016-02-27T04:27:48+5:302016-02-27T04:27:48+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेसाठी जिल्हानिहाय प्रत्येकी ८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परंतू कॉपीचे प्रकरण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेसाठी जिल्हानिहाय प्रत्येकी ८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परंतू कॉपीचे प्रकरण घडत असतानाही भरारी पथकांकडून सातत्याने ‘कॉपी प्रकरण निरंक‘च अहवाल येत असल्याने यावर साशंकता निर्माण केली जात आहे.
या भरारी पथकांना प्रतिदिन प्रवास भत्ता १० ते १२ हजार रुपये दिला जात आहे. भरारी पथकांनी दररोज विभागीय मडंळाच्या अखत्यारीत असलेल्या पुणे, सोलापूर आणि अहमदनगर मधील परिक्षा केंद्रांवर अचानक भेटी देत त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी, तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु, सक्षम अधिकारी परिक्षा केंद्रांवर जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा पथकांद्वारे केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल अभिप्राय पुस्तिकामध्ये शेरे देणे बंधनकारक आहे. मात्र, भरारी पथकांकडून कॉपी आणि अन्य गैरप्रकारांचा अहवाल निरंक दिला जात आहे. (प्रतिनिधी)