दुखलं नाही म्हणून लस दिलीच नाही, असा गैरसमज झाल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:25+5:302021-06-27T04:09:25+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेताना दुखलं नाही त्यामुळे आपल्याला लस दिलीच गेली नाही, असा एका तरुणाचा गैरसमज झाला. ...
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस घेताना दुखलं नाही त्यामुळे आपल्याला लस दिलीच गेली नाही, असा एका तरुणाचा गैरसमज झाला. त्यामुळे मुकुंदनगर येथील रांका हॉस्पिटलमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, डॉक्टरांनी समजावून सांगितल्यावर या तरुणाचा गैरसमज दूर होऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मुकुंदनगरमधील रांका हॉस्पिटलमध्ये सध्या लसीकरण सुरू आहे. साहिल शहा यांनी येथे लस घेतली होती. मात्र, लस घेताना दुखले नाही त्यामुळे आपल्याला लस दिलीच गेली नाही, असा त्यांचा गैरसमज झाला. याबाबत जाब विचारणारा व्हिडीओ त्यांनी बनविला होता. मात्र, रांका हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश रांका यांनी त्यांचा गैरसमज दूर केला. त्यानंतर डॉ. रमेश रांका यांच्यासोबत व्हिडीओ करून साहिल शहा यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.