कदमवस्ती स्वॅब केंद्रावर गोंधळ- दररोज क्षमता फक्त ५, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेत नाहीत टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:21+5:302021-04-20T04:10:21+5:30
नुकतेच या केंद्राला आमदार, खासदारांनी भेट दिली होती. त्या भेटीचा हवाला देत. प्रिसक्रिप्शन शिवाय स्वॅब घेतला जाणार नाही, अशी ...
नुकतेच या केंद्राला आमदार, खासदारांनी भेट दिली होती. त्या भेटीचा हवाला देत. प्रिसक्रिप्शन शिवाय स्वॅब घेतला जाणार नाही, अशी भूमिका येथील कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमांचा फज्जा उडालेल्या पाहायला मिळाला.
----------------------
चिठ्ठी शिवाय टेस्ट नाही, असा कोणताही नियम झाला नाही. तेथील कर्मचाऱ्यांनी अशी भूमिका कोणाच्या सांगण्यावरून घेतली याची चौकशी करतो. परंतु या ठिकाणी खासगी कंपन्यांमधील अनेक कर्मचारी ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. केवळ ऑफिसमध्ये दाखविण्यासाठी सर्टिफिकेट द्यायचे आहे असे लोक येतात. त्यामुळे खऱ्या गरजू रुग्णांचा स्वॅब घेता येत नाही. खासगी कंपन्यांनी आपल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
-डॉ.डी.जे जाधव, आरोग्य अधिकारी
-------------------
चिठ्ठी शिवाय स्वॅब देता येणार नाही. या नियमांचा या ठिकाणी कुठही फलक लावला नाही. त्यामुळे महिला, जे दोन दोन दिवसांपासून हेलपाटे मारत आहेत त्यांना यामुळे मनस्ताप झाला. कोणीही गंमत म्हणून स्वॅब द्यायला येत नाही. त्रास होतो म्हणूनच या ठिकाणी येतात. त्यामुळे स्वॅबची संख्या 50 वरून 100 करावी.
- श्रीहरी राक्षे, नागरिक
--------------------
तो स्वयंघोषित स्वयंसेवक
एक महावितरणचा कंत्राटदार स्वयंसेवकाच्या भूमिकेत होता. जो स्वतःला फ्रंटलाईन वर्कर म्हणत होता. त्याने मी प्रशासकीय अधिकाऱ्याचा मेहुणा आहे असे सांगितले. आमदारांच्या खासदारांच्या भेटीचा दाखला देत. या ठिकाणी लावण्यात आलेली व्यवस्था विस्कळित केली. त्याला आरोग्य कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यामुळे याठिकाणी भांडणाची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळा स्वतःचे नंबर लावण्यासाठी हा खटाटोप केला, असे प्रत्यक्षदर्शी रुग्णांनी, नागरिकांनी सांगितले.
-------------------