‘एमपीएससी’चा गोंधळात गोंधळ चालूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:17+5:302021-08-26T04:14:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून (एमपीएससी) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा २०१९, मे २०१९ ला वनक्षेत्रपाल पदासाठी घेण्यात ...

The confusion of ‘MPSC’ continues | ‘एमपीएससी’चा गोंधळात गोंधळ चालूच

‘एमपीएससी’चा गोंधळात गोंधळ चालूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून (एमपीएससी) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा २०१९, मे २०१९ ला वनक्षेत्रपाल पदासाठी घेण्यात आली. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मराठा आरक्षण रद्द केल्याने नव्याने लावण्यात आलेल्या निकालात अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे मुख्य परीक्षेची शैक्षणिक पात्रता २०१६ चा नियम दाखवून २०१९ च्या परीक्षेसाठी गट ब पदासाठी करण्यात आली. तीही ऐनवेळी थेट मुलाखतीदरम्यान. यातून एमपीएससीच्या कमालीच्या गोंधळामुळे उमेदवारांना धक्का बसला आहे.

जाहिरातीत वनक्षेत्रपाल पदासाठी नमूद इन्स्ट्रूमेंटेमेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, फूड सायन्स आदी अभियांत्रिकी शाखेच्या समकक्ष इतर अभियांत्रिकी शाखा उत्तीर्ण उमेदवारांना गट अ व ब पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा देता आली. दरम्यान, विधानसभा निवडणूक, सरकार स्थापनेस विलंब, कोविड-१९ आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे तब्बल ११ महिन्यांनी, जुलै २०२० मध्ये मुलाखतीसाठी पदानुक्रम पसंती दर्शविण्यासाठी लिंक ओपन झाली. त्यात उमेदवारांनी गट अ आणि गट ब असे दोन्ही पदांसाठी अनुक्रमे १ आणि २ पदानुक्रम भरले. मात्र पुन्हा नव्याने ओपन झालेल्या पसंती दर्शविण्यासाठी लिंकमध्ये वरील समकक्ष अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधारकांना वनक्षेत्रपाल पदासाठी वगळण्यात आले. यामुळे उमेदवारांची संधी हुकणार आहे. एमपीएससी आणि वन विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला तर सुमारे ३८ उमेदवारांना नोकरी मिळू शकते, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

चौकट

असा आहे घटनाक्रम

वनसेवा परीक्षा जाहिरात : मार्च २०१९

एकूण जागा : १००

मुख्य परीक्षा : सप्टेंबर २०१९

मुख्य परीक्षेचा निकाल : जानेवारी २०२०

मुलाखत वेळापत्रक : जुलै २०२० मध्ये जाहीर

ऑगस्ट २०२० - शंभर वनसेवा जागांसाठी ३२२ उमेदवारांची मुलाखत

५ मे २०२१ - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले.

जुलै २०२१ - स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षार्थीच्या आत्महत्येनंतर गदारोळ आणि मग आरक्षणाबाबत शासन निर्णय

जुलै २०२१ - वन सेवेच्या मुख्य परीक्षेचा निकाल नव्याने लावला.

-नव्याने मुलाखतीस पात्र ३८ उमेदवारांसाठीच पसंती लिंक ओपन न होता, सगळ्याच वनसेवा उमेदवारांसाठी लिंक पुन्हा सुरू झाली.

-प्रॉडक्शन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फूड सायन्स, इन्स्ट्रूमेंटेमेशन, मेटलर्जी इत्यादी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांना ‘प्रेफरन्स लिंक’मध्ये फक्त सहायक वनसंरक्षक (गट-अ) पदालाच पदानुक्रम भरण्याची सुविधा देण्यात आली.

- वनक्षेत्रपाल (गट-ब) या पदासाठी पदानुक्रम भरण्याची संधी काहीच पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आली.

Web Title: The confusion of ‘MPSC’ continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.