लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास केलेल्या नागरिकांच्या नावात तफावत असल्याने गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:09 PM2020-04-10T23:09:18+5:302020-04-10T23:09:55+5:30

कपूर व वाधवान या दोन्ही कुटुंबांच्या यादीत सामाहिक असलेले जसप्रित सिंग, इंद्रलोक चौधरी, प्रदिप कांबळे, रमेश शर्मा व तारक सरकार यांच्याच नावाची नोंद लोणावळा नगरपरिषदेत असून त्यांची माहिती आयडीएसपी (IDSP) या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.

confusion as to the names of citizens who traveled from Lonavla to Mahabaleshwar | लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास केलेल्या नागरिकांच्या नावात तफावत असल्याने गोंधळ 

लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास केलेल्या नागरिकांच्या नावात तफावत असल्याने गोंधळ 

Next

लोणावळा : देशभरात लाॅकडाऊन असताना लोणावळा ते महाबळेश्वर असा रेड कार्पेट प्रवास केलेल्या नागरिकांच्या लोणावळा व महाबळेश्वर येथील नावांमध्ये तफावत असल्याचा अहवाल लोणावळा मुख्याधिकारी यांनी म‍ावळ तहसीलदारांना दिला आहे. राज्याचे गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी ज्या पाच वाहनांना व 24 जणांना लोणावळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याकरिता सवलत दिली होती. त्यापैकी केवळ पाच नावे काॅमन आहेत. इतर नावांमध्ये मात्र फरक आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व संसर्ग यादरम्यान लोणावळा नगरपरिषद मुंबई व पुणे येथून आलेल्या नागरिकांच्या नावाची यादी देताना ती कपूर आडनावाने  देण्यात आला असून स्वतःच्या खर्‍या नावाचा उल्लेख केला नसल्याचे दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  पिकाॅक सोसायटी लोणावळा येथे मुंबईहून रहिवासाला आलेल्या एका व्यक्तीने सर्वांच्या नावाचा उल्लेख 25 मार्च रोजी स्वहस्ताक्षरात नोंदविला आहे. लोणावळा ते महाबळेश्वर असा प्रवास केलेल्या व्यक्ती ह्या वाधवान कुटुंबातील सदस्य कर्मचारी आहेत.

या नावापैकी केवळ पाच नावे लोणावळ्यात सामायिक असून इतरांमध्ये वाधवान नव्हे तर कपूर नावे समोर आली आहेत. कपूर परिवारातील 9 व इतर 11 अशी 20 लोक लोणावळ्यातील गोल्ड व्हॅली भागातील एका खासगी बंगल्यात 25 मार्च पासून वास्तव्यात होती. लोणावळ्यातील भुरट नावाच्या एका कमिशन एजंटने 20 मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने एका खासगी बंगल्यात सदरची बुकिंग घेतली असल्याचे नगरपरिषदेला लेखी कळविले आहे. 

22 मार्च रोजी लाॅकडाऊन झालेले असताना 25 मार्च रोजी ही मंडळी मुंबईतून लोणावळ्यात दाखल कशी झाली. वाधवान कुटुंबातील कोणीही सदस्यांनी लोणावळा खंडाळ्यात वास्तव केल्याची नोंद नाही. दुसरे म्हणजे गृहसचिवांनी परवानगी दिलेल्या वाधवान कुटुंबातील काही सदस्यांची नावे लोणावळ्यात कपूर कुटुंबांसोबत दिसत आहे.  हे कपूर कुटुंब देखील महाबळेश्वरला गेले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. कपूर व वाधवान या दोन्ही कुटुंबांच्या यादीत सामाहिक असलेले जसप्रित सिंग, इंद्रलोक चौधरी, प्रदिप कांबळे, रमेश शर्मा व तारक सरकार यांच्याच नावाची नोंद लोणावळा नगरपरिषदेत असून त्यांची माहिती आयडीएसपी (IDSP) या संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.

इतर नावांमध्ये बहुतांश कपूर आडनावे नोंदविण्यात आली आहेत. त्यासर्वांनी लोणावळा येथून जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी घेऊन महाबळेश्वर येथे जाणे अपेक्षित असताना नगरपरिषदेला अवगत न करता अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त परवानगी पत्र नगरपरिषदेकडे जमा करून जाणे अपेक्षित असताना तसे काहीही न करता नगरपरिषदेला पुर्व सुचना न देता लोणावळा नगरपरिषद हद्द सोडली असल्याचा अहवाल लोणावळा मुख्याधिकारी सचिन पवार यांनी मावळचे तहसिलदार तथा मावळ तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुसूदन बर्गे यांना पाठविला आहे.

Web Title: confusion as to the names of citizens who traveled from Lonavla to Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.