विभागीय मंडळाचाच उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:25+5:302021-07-28T04:10:25+5:30
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून त्यासाठी आवश्यक ...
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून त्यासाठी आवश्यक परीक्षा केंद्रांची यादी प्रसिद्ध करताना पुणे विभागीय शिक्षण मंडळाचा गोंधळ उडाला. पूर्व भागांमध्ये पश्चिम भागातील ठिकाणांचा तर, पश्चिम भागात पूर्वेकडील ठिकाणांचा उल्लेख केलेली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, मंडळाला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यात सुधारणा केली.
अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सीईटीसाठी कोणत्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडावे, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे पुणे विभागीय मंडळाने पुणे पूर्व व पुणे पश्चिम भागातील ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, चुकीची यादी प्रसिद्ध केल्याने गोंधळ निर्माण झाला. परंतु, काही कालावधीनंतर मंडळाने सुधारित यादी प्रसिद्ध केली.
-----
पुणे शहरासाठी झोन/ परिसरनिहाय परीक्षा केंद्र स्थळांची यादी
पुणे पूर्व - कॅम्प, हडपसर, बंडगार्डन, लुल्लानगर, येरवडा, रास्ता पेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, खडकी, कोरेगाव पार्क, घोरपडी, पुलगेट, मुंढवा, मंगळवार पेठ, विमानगगर, टिंगरेनगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, कोंढवा, दिघी, महादेवनगर, धानोरी, उंड्री, पिसोळी आदी.
-----
पुणे पश्चिम -
कर्वेनगर, एरंडवणा, लक्ष्मी रस्ता, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, डेक्कन जिमखाना, टिळक रस्ता, शिवाजीनगर, नारायण पेठ, कसबा पेठ, औंध, बाणेर, पर्वती, महर्षीनगर, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, रविवार पेठ, पौड रस्ता, वडगाव बुद्रूक आदी.
-----------------------------