Police Recruitment: मेगा पोलीस भरती प्रक्रियेत ‘नॉनक्रिमीलीयर’बाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:26 PM2022-11-09T17:26:54+5:302022-11-09T17:27:23+5:30

उमेदवारांची शुध्दीपत्रक काढण्याची मागणी

Confusion over noncriminal in mega police recruitment process | Police Recruitment: मेगा पोलीस भरती प्रक्रियेत ‘नॉनक्रिमीलीयर’बाबत संभ्रम

Police Recruitment: मेगा पोलीस भरती प्रक्रियेत ‘नॉनक्रिमीलीयर’बाबत संभ्रम

googlenewsNext

बारामती : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी १८ हजार ३३१ पोलीस शिपाई पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रक्रियेत कागदपत्राबाबतची नॉनक्रिमीलीयर प्रमाणपत्र १  एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील असावे. अन्यथा निवड रद्द केली जाईल,अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावर्षीचे कागदपत्रे कशी काढावीत. यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोधळ निर्माण झाला आहे, तरी शासनाने तत्काळ नॉन क्रिमीलीयर च्या मुदतीमध्ये बदल करून शुध्दीपत्रक जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

मेगापोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई १४ हजार ९५६ पदे, पोलीस वाहन चालक २१७४ पदे तर सशस्त्र पोलीस शिपाई (एसआरपीएफ) १२०१ पदे अशी एकूण १८३३१ पदांची मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू जाली आहे. ही आतापर्यंतची महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती प्रकिया आहे. या भरतीमध्ये मुंबईला सर्वाधिक ७०७६ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. नव्याने निर्माण जालेल्या मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रिया होत आहे.

महाराष्ट्रामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार होती. परंतु वयवाढीच्या मुद्यामुळे ही भरती प्रक्रिया काहीशी पुढे ढकलण्यात आली, तद्नंतर उमेदवारांना २ वर्षांची वय वाढ देण्यात येऊन ही भरती प्रक्रिया ९  नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची ९ ते  ३० नोव्हेंबर पर्यंत २१ दिवस असणार आहे. पोलीस शिपाई पदासांठी प्रथम ५०  गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा, त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११०: प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे.  अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.

बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की,  दरवर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासनाकडून काहीतरी त्रुटी रहात असतात. यावर्षीच्या भरतीप्रक्रियेतही कागदपत्राबाबतची एक सूचना देण्यात आली आहे व त्यामध्ये नॉनक्रिमीलीयर प्रमाणपत्र १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वषार्तील असावे, अन्यथा निवड रद्द केली जाईल. अशी सूचना दिल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोधळ निर्माण झाला आहे, की आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावषीर्चे कागदपत्रे कशी काढावीत. तरी शासनाने तत्काळ नॉन क्रिमीलीयर च्या मुदतीमध्ये बदल करून शुध्दीपत्रक जाहीर करावे,अशी मागणी रुपनवर यांनी केली आहे.

Web Title: Confusion over noncriminal in mega police recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.