सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीने गोंधळ

By admin | Published: March 31, 2015 05:27 AM2015-03-31T05:27:11+5:302015-03-31T05:27:11+5:30

शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (डीपी) राज्य शासनाने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने मुख्यसभेत

Confusion of power hijacking | सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीने गोंधळ

सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीने गोंधळ

Next

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (डीपी) राज्य शासनाने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने मुख्यसभेत जोरदार निदर्शने केली. तर, मनसेनेही सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या दिरंगाईमुळे पुणेकरांचा अधिकार हिरावल्याची टीका करीत मनसेनेही निदर्शने केली. तब्बल अर्धा तास चाललेल्या घोषणाबाजीमुळे महापालिकेत गोंधळाचे वातावरण होते.
विकास आराखड्याची मुदत संपल्याने महापालिकेने राज्य शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवून दोन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, गेल्या शुक्रवारी उशिरा हा आराखडा राज्य शासनाने ताब्यात घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, तसेच मनसे आणि रिपाइंमध्ये नाराजीचा सूर आहे. हा आराखडा सोमवारी मान्य करण्याचा महापालिकेतील नगरसेवकांचा निर्णय झाला होता. त्यानुसार, आज सकाळी साडेअकरा वाजता मुख्य सभा सुरू होताच, शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून मुख्य सभेत आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट शासनाच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. तसेच या निर्णयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट जबाबदार असल्याची टीका करीत या दोन्ही नेत्यांच्या निषेधाची जोरदार घोषणाबाजी महापौरांच्या समोर केली.
या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी युती शासनाच्या विरोधातही घोषणा दिल्या. राष्ट्रवादीकडून हिटलरच्या वेशातील पालकमंत्री बापट यांचे, तर गुंडाच्या वेशातील मुख्यमंत्री फडणवीस यांचे फलक झळकवण्यात आले.

Web Title: Confusion of power hijacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.