भोर खरेदी-विक्री संघावर काँगे्रसचेच वर्चस्व

By admin | Published: June 29, 2015 11:52 PM2015-06-29T23:52:33+5:302015-06-29T23:52:33+5:30

तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्र्री संघाच्या व्यक्ती सभासद प्रतिनिधी या मतदारसंघात एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँगे्रचे उमेदवार शिवाजी नाटंबे

Congregation dominance in dawn buying team | भोर खरेदी-विक्री संघावर काँगे्रसचेच वर्चस्व

भोर खरेदी-विक्री संघावर काँगे्रसचेच वर्चस्व

Next

भोर : तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्र्री संघाच्या व्यक्ती सभासद प्रतिनिधी या मतदारसंघात एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँगे्रचे उमेदवार शिवाजी नाटंबे
यांनी राष्ट्रवादीच्या सोमनाथ सोमाणी यांचा १०५ मतांनी दणदणीत
पराभव केला.
यापूर्वीच बिनविरोध झालेल्या सर्व १६ जागा काँगे्रसच्या असल्याने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून खरेदी-विक्री संघावर पुन्हा एकदा आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखले आहे. भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १७ जागांसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
छाननीत १८ उमेदवारी अर्ज बाद झाल्याने २५ अर्ज शिल्लक राहिले होते. तर, ७ जणांनी माघार घेतल्याने १७ पैकी १६ जागा बिनविरोध झाल्या. या सर्व जागा काँगे्रसच्या आहेत.
विविध मतदारसंघात बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे व जागा खालील प्रमाणे : विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघ (१० जागा) बाळू शिंदे, राजेंद्र सोनवणे, शंकर मालुसरे, अरविंद सोंडकर,
बापू लेकावळ, काळुराम मळेकर,
शरद पडवळ, हनुमंत शिरवले, राजेंद्र घोलप, सोपान म्हस्के; संस्था प्रतिनिधी मतदार संघ (एक जागा) अतुल किंद्रे; अनुसूचित जाती जमाती मतदार संघ (एक जागा) दत्तात्रय कांबळे; महिला प्रतिनिधी (दोन जागा) मनीषा बाठे, नंदा बोडके; इतर मागास प्रवर्ग(एक जागा) ज्ञानेश्वर झोरे, विमुक्त जाती जमाती (एक जागा) ज्ञानेश्वर भोसले हे बिनविरोध निवडून आले आहेत.
निकाल जाहीर झाल्यावर
कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश
सोनवणे यांच्या हस्ते कॉँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघाचे अध्यक्ष हनुमंत शिरवले, दिलीप
बाठे, अशोक शिवतरे व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

व्यक्ती सभासद प्रतिनिधी मतदारसंघात एका जागेसाठी काँगे्रसकडून शिवाजी पांडुरंग नाटंबे व राष्ट्रवादीकडून सोमनाथ हिरालाल सोमाणी यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात एकूण ४४९ मतदार होते. त्यापैकी सरासरी १९६ मतदार मयत व बाहेर गावी असल्याने २६३ पैकी २३२ मतदारांनी मतदान केले. तर, एक मत बाद झाले. त्यात शिवाजी नाटंबे यांना १६८, तर सोमनाथ सोमाणी यांना ६३ मते मिळाली. यामुळे नाटंबे १०५ मतांनी निवडून आले. बिनविरोध झालेल्या १६ जागा निवडणूक लागलेली एक, अशा जागांच्या निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी श्रीमती ए. बी. पवार यांनी जाहीर केली.

Web Title: Congregation dominance in dawn buying team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.