पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार- आ. संग्राम थोपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:46 PM2021-10-20T17:46:07+5:302021-10-20T17:52:05+5:30
भोंगवली - वेळू गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा धांगवडी (ता.भोर) येथे भोर काँग्रेसच्यावतीने आयोजित केला होता. त्यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते
नसरापूर (पुणे): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये प्रत्येक गटात उमेदवाराची निवड करण्याकरीता जनतेनेच त्याचे नाव सुचवावे. सुचविलेल्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल त्याकरीता भावकीतील, माझ्या गटातील किंवा समाजातील असा आता मतभेद होणार नाही, असे आमदार संग्राम थोपटे यांनी धांगवडी येथे सांगितले.
भोंगवली - वेळू गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा धांगवडी (ता.भोर) येथे भोर काँग्रेसच्यावतीने आयोजित केला होता. त्यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. त्यावेळी थोपटे म्हणाले, उमेदवाराची निवड ही काँग्रेस पक्षाशी असणारी त्याची एकनिष्ठता, समाजात असणारी त्याची प्रतिमा, त्याची सक्रियता आणि त्याने केलेल्या विकासकामांवर उमेदवाराची निवड होत असते.
यावेळी भोर काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, राजगडचे उपाध्यक्ष विकास कोंडे, किसनराव सोनवणे, पोपटराव सुके, शंकरराव धाडवे, काशिनाथ धाडवे, मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, मदन खुटवड, सुरेखा निगडे, युवा अध्यक्ष नितीन दामगुडे, महेश टापरे, उपसरपंच पंकज गाडे, माऊली पांगारे, ख. वि. संघ उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, राज तनपुरे, सरपंच, उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोर तालुक्यातील भोर नगरपालिका, खरेदी-विक्री संघ, भोर कृषी उत्पन्न बाजार समिती, राजगड साखर कारखाना येथील सर्वच्या सर्व जागावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. भोंगवली - वेळू गटातील ४५ पैकी ३४ गावांमध्ये व सर्व संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे यावेळी पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार असे आमदार संग्राम थोपटे यांनी सुतोवाच केले.