महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हवेली तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:44 AM2017-09-21T00:44:27+5:302017-09-21T00:44:30+5:30

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीसह वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यातील हवेली तालुका तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Congress aggression against inflation, hindu taluka congress party's protest on behalf of the central government | महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हवेली तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, हवेली तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

Next

धायरी : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीसह वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यातील हवेली तालुका तहसीलदार कचेरीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हेच का अच्छे दिन, इंधन व गॅसवरील दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत भाजपा सरकारचा व वाढत्या महागाईचा निषेध काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. महागाई विरोधातील बॅनर्स, फलक, झेंडे घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर ठाण मांडून होते.
केंद्र व राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने महागाईत वाढच होत आहे. नोकरदार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या भावना तीव्र असून, त्या सरकार दरबारी पोहचवण्यासाठी हवेली काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील, हवेली तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर, संजय अभंग, नंदकुमार चौधरी, खडकवासला पक्षप्रमुख राहुल मते, लहू निवंगुणे, अवधूत मते, सीमा सावंत, सोनाली मारणे, कमलाकर सावंत, वसंत शेवाळे, पृथ्वीराज पाटील, आर. जी. यादव, एस. के. जावळकर, संजय वसे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Congress aggression against inflation, hindu taluka congress party's protest on behalf of the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.