नोटा रद्दच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: November 18, 2016 05:57 AM2016-11-18T05:57:44+5:302016-11-18T05:57:44+5:30
सासवड (ता. पुरंदर) येथील नगर परिषदेच्या चौकात तालुका काँग्रेसच्या (आय) वतीने नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
नारायणपूर : सासवड (ता. पुरंदर) येथील नगर परिषदेच्या चौकात तालुका काँग्रेसच्या (आय) वतीने नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती विठ्ठल मोकाशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मंदार गिरमे, माजी नगरसेवक संजयनाना जगताप, मोहन जगताप, युवक अध्यक्ष विकास इंदलकर, सचिन दुर्गाडे, संभाजी काळाने, शिवराम शेंडकर, धर्माजी गायकवाड, सुदर्शन कुदळे, नंदुबापू जगताप, पिनू काकडे, मयूर मुळीक, नवनाथ मोरे, संदीप फडतरे, सागर जगताप, शेखर बडधे, विशाल हरपळे, आप्पा बोरकर, आशू जगताप, राहुल बोरकर आदी उपस्थित होते.
या वेळी मंदार गिरमे, सचिन दुर्गाडे, विकास इंदलकर आदींनी मनोगत व्यक्त केले. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.