काँग्रेस काळ्या पैशांच्या बाजूने - प्रकाश जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:08 AM2017-10-30T04:08:30+5:302017-10-30T04:08:42+5:30
काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारने मागील वर्षी ८ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा दिवस भारतीय जनता पक्ष काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे.
पुणे : काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारने मागील वर्षी ८ नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा दिवस भारतीय जनता पक्ष काळा पैसा विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून काळ््या पैशाचे समर्थन करणारे आंदोलन केले जाणार आहे, अशी टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे केली.
काँग्रेसच्या काळात जनतेला ज्यांनी लुटले त्यांच्याच बाजुने पक्षा उभा राहत आहे. काळा पैसा विरोधी दिनानिमित्त देशभरात व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, जनजागरण मोहीम, डिजिटल साक्षरता असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ५०० व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर १६ हजार कोटी रुपये परत आले नाहीत. २ लाख बनावट कंपन्यांची खाती गोठविण्यात आली. सुमारे ३ लाख कोटींचे ४ लाख ७१ हजार व्यवहार संशयास्पद आढळून आले. तसेच विविध देशांशी करार, नवीन कायदेही करण्यात आले. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन सत्तेच्या दलालांचे दुकान संपुष्टात आले, असे ते म्हणाले.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) हे सर्व पक्षांचे अपत्य आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ७० वर्षांची पद्धत बदलताना
काही अडचणी येतात. जीएसटी परिषदेमध्ये त्यावर चर्चा होऊन अडचणी दूर केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.