टापरेवाडी ग्रामपंचायतीवर ४० वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:06+5:302021-01-21T04:11:06+5:30
पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली टापरेवाडी मागील ४० वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महेश ...
पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली टापरेवाडी मागील ४० वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीला एक जागेवर समाधान मानावे लागले.
महेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा ठाकरे, अजय टापरे, अनिल टापरे, श्रीरंग टापरे यांच्या सहकार्याने नवनिर्माण ग्रामविकास पॅनल तयार करून निवडणुकीत उतरले होते. अटीतटीच्या झालेल्या आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला ६ तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे.
काँग्रेस पुरस्कृत नवनिर्माण ग्रामविकास पँनलचे विजयी उमेदवार महेश निवृत्ती टापरे, वैशाली प्रवीण चव्हाण, भारती सुरेश टापरे, वंदना उत्तम टापरे, संतोष सोनबा सपकाळ, लता किसन टापरे यांचा आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली टापरेवाडीचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे पॅनलप्रमुख महेश टापरे यांनी सांगितले.
२० भोर टापरेवाडी